Post Office Scheme : भारतात सुरक्षित गुंतवणुकीसाठी आजही फिक्स डिपॉझिटला विशेष महत्त्व आहे. फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. अलीकडे बँकेच्या एफडी योजनेत तसेच पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेतही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होताना दिसत आहे.
पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये केलेली गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असते. यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवत आहेत.
पोस्ट ऑफिसची एफडी योजना अर्थातच टीडी म्हणजेच टाईम डिपॉझिट योजनेमध्ये अनेक जण गुंतवणूक करतात. पोस्ट ऑफिसकडून एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष आणि पाच वर्ष कालावधीची टीडी योजना ऑफर केली जात आहे.
या योजनेचे स्वरूप हे एफ डी योजनांसारखेच असते. यामुळे याला पोस्टाची एफडी योजना म्हणून ओळखतात. दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिसच्या याच टीडी योजनेची सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कशी आहे पोस्ट ऑफिसची टीडी योजना
पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष आणि पाच वर्ष कालावधीची टीडी योजना ऑफर केली जात असून यामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणुकीसाठी वेगवेगळे व्याजदर लागू आहेत.
एका वर्षाच्या टीडी योजनेवर पोस्टाच्या माध्यमातून 6.9 टक्के, दोन वर्षांच्या टीडी योजनेवर पोस्टाच्या माध्यमातून सात टक्के, तीन वर्ष कालावधीच्या टीडी योजनेवर 7.10% आणि पाच वर्ष कालावधीच्या टीडी योजनेवर 7.50% दराने व्याज ऑफर केले जाते. आता आपण पोस्टाच्या पाच वर्षांच्या टीडी योजनेची सविस्तर माहिती पाहूयात.
पाच वर्षांच्या टीडी योजनेत 12 लाख रुपये गुंतवले तर किती रिटर्न मिळणार?
पोस्ट ऑफिसच्या पाच वर्षांच्या टीडी योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर पोस्टाकडून 7.50% दराने व्याज दिले जाते. जर समजा या योजनेत एखाद्या ग्राहकाने 12 लाख रुपये गुंतवले तर त्याला मॅच्युरिटीवर म्हणजेच 60 महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर 17 लाख 39 हजार 938 रुपये मिळतात. अर्थातच बारा लाख रुपयांची इन्वेस्टमेंट केल्यास ग्राहकांना पाच लाख 39 हजार 938 रुपये रिटर्न मिळतात.