नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार मोठी भेट ! ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार नमो शेतकरीचा हफ्ता

नमो शेतकरी योजनेसाठी जे शेतकरी पीएम किसान साठी पात्र आहेत तेचं शेतकरी पात्र ठरवले जातात. नमो शेतकरी योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना एकूण पाच हप्ते देण्यात आले आहेत. दरम्यान, आता या योजनेच्या पुढील हत्यासंदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे.

Tejas B Shelar
Published:

Namo Shetkari Yojana : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. केंद्रातील मोदी सरकारने 2019 साली पी एम किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची भेट दिली जात आहे. मात्र हे पैसे शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळत नाहीत.

दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण होते. पी एम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना 18 हप्ते देण्यात आले आहेत. दुसरीकडे याचं योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे.

राज्य शासनाने सुरू केलेल्या या योजनेच्या माध्यमातून देखील पीएम किसान योजनेप्रमाणेच शेतकऱ्यांना लाभ दिला जातोयं. नमो शेतकरी योजनेअंतर्गत पीएम किसान प्रमाणे दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे वार्षिक 6,000 रुपयाचा लाभ मिळतोय.

नमो शेतकरी योजनेसाठी जे शेतकरी पीएम किसान साठी पात्र आहेत तेचं शेतकरी पात्र ठरवले जातात. नमो शेतकरी योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना एकूण पाच हप्ते देण्यात आले आहेत.

दरम्यान, आता या योजनेच्या पुढील हत्यासंदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. नमो शेतकरीचा पुढील हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार याबाबत एक नवे अपडेट हाती येत आहे.

केव्हा मिळणार नमो शेतकरीचा हफ्ता?

मीडिया रिपोर्टनुसार, नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता नव्या वर्षात जारी केला जाणार आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हफ्ता शेतकऱ्यांना मिळण्याची दाट शक्यता आहे.

यामुळे फेब्रुवारी महिन्यातच नमो शेतकरीचा पुढील हप्ता म्हणजे 6वा हफ्ता देखील शेतकऱ्यांना दिला जाऊ शकतो. नमो शेतकरीचा पाचवा हप्ता आणि पीएम किसानचा अठरावा हप्ता एकाच दिवशी पात्र शेतकऱ्यांना मिळाला होता.

5 ऑक्टोबर 2024 ला या दोन्ही योजनांचे 4000 रुपये महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हफ्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता हा फेब्रुवारी 2025 मध्ये सोबतच जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या दोन्ही योजनेअंतर्गत प्रत्येक चार महिन्यांनी एक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो. यामुळे, ऑक्टोबर महिन्यात या योजनेचे पैसे मिळाले असल्याने आता फेब्रुवारी 2025 मध्ये या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe