नाथाभाऊंनी हिवाळ्यात केला खरबूज लागवडीचा प्रयोग यशस्वी! एकरी 12 लाख रुपये उत्पन्न मिळण्याची आहे अपेक्षा

कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तुम्ही त्याच त्याच गोष्टी न करता त्यामध्ये काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न केला किंवा काहीतरी नवनवीन गोष्टी करत राहिलात तर त्यातून काहीतरी फायद्याची किंवा नाविन्यपूर्ण अशी एखादी फायदेशीर गोष्ट हाती लागते.

Ajay Patil
Published:
melon crop

Melon Crop Cultivation:- कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तुम्ही त्याच त्याच गोष्टी न करता त्यामध्ये काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न केला किंवा काहीतरी नवनवीन गोष्टी करत राहिलात तर त्यातून काहीतरी फायद्याची किंवा नाविन्यपूर्ण अशी एखादी फायदेशीर गोष्ट हाती लागते.

कुठलेही प्रयोग जर करत राहिले तर त्या प्रयोगांती काहीतरी फायद्याचे सापडते व त्यातूनच व्यक्तीची प्रगती देखील होत असते. अगदी हाच मुद्दा कृषी क्षेत्राला देखील लागू होतो. कृषी क्षेत्रामध्ये जर बघितले तर आता अनेक परंपरागत शेतीच्या ज्या काही पद्धती होत्या त्यामध्ये बदल घडवून नाविन्यपूर्ण रीतीने आधुनिक लागवडीच्या पद्धती शेतकरी अवलंबू लागला आहे.

इतकेच नाहीतर पारंपारिक पिकांना फाटा देत आता शेतकरी आधुनिक पद्धतीने व तंत्रज्ञानाचा वापर करून फळबाग लागवड तसेच विविध भाजीपाला लागवडीतून कमी क्षेत्रामध्ये देखील लाखो रुपये मिळवण्यामध्ये यशस्वी झाला आहे. तसेच आताचे शेतकरी प्रयोगशील असल्यामुळे अनेक नवनवीन प्रयोग करत असतात व या प्रयोगांमध्ये देखील ते यशस्वी होतात व लाखो रुपये कमवतात.

असाच काहीसा प्रयोग पंढरपूर जिल्ह्यातील सांगोल्यातील सोनलवाडी या गावचे प्रयोगशील शेतकरी नाथा हेगडे यांनी केला. त्यांनी चक्क हिवाळ्यामध्ये खरबूज लागवड केली व त्याचे उत्पादन घेण्यामध्ये ते यशस्वी ठरले आहेत.

हिवाळ्यात खरबूज लागवडीचा प्रयोग ठरला यशस्वी
कुठल्याही पिकाची जर लागवड करायची राहिली तर त्याचा एक निश्चित असा कालावधी असतो असे म्हटले जाते.परंतु या गोष्टीलाच फाटा देत सांगोला तालुक्यातील सोनलवाडी या गावचे प्रयोगशील शेतकरी नाथा हेगडे यांनी जानेवारी ते मार्च यादरम्यान लागवड केल्या जाणाऱ्या खरबूज पिकाची हिवाळ्यात लागवड करून त्याचे यशस्वी उत्पादन घेण्यापर्यंत मजल मारली आहे.

विशेष म्हणजे सांगोला तालुका हा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो या पट्ट्यामध्ये या शेतकऱ्याने केलेला हिवाळ्यातील खरबूज लागवडीचा प्रयोग नक्कीच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी असा आहे. हा प्रयोग यशस्वी होण्यामागील जर प्रमुख कारण बघितले तर ते आहे त्यांचे योग्य असे नियोजन होय. नाथा हेगडे यांच्याकडे दोन एकर खडकाळ माळरान अशी जमीन आहे.

या जमिनीवर त्यांनी खरबूज लागवड करण्याचा निर्णय घेतला व बॉबी खरबुजाची लागवड केली. विशेष म्हणजे खरबूज पिकाची लागवड ही जानेवारी ते मार्च या महिन्याच्या कालावधीत केली जाते.

परंतु त्यांनी चक्क हिवाळ्यात खरबूज लागवड करून ते काढणीस देखील तयार केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी ही लागवड करून हिवाळ्यात उत्पन्न मिळावे या दृष्टिकोनातून सगळे नियोजन केले होते व त्यांच्या या सगळ्या कष्टाला मात्र आता फळ मिळाल्याचे दिसून येत आहे.

30 टन खरबुजाचे उत्पन्न मिळण्याची आहे अपेक्षा
खरबूज लागवड केल्यानंतर त्यांनी या पिकाचे खूप व्यवस्थित असे नियोजन ठेवले. लागवडीपासून तर पाणी व्यवस्थापन आणि आवश्यक त्या खतांचे व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून योग्य नियोजन केले व त्यामुळे त्यांच्या शेतामध्ये खरबुजाचे पीक बहरले व आता ते पीक काढणीला आले असून या दोन एकर क्षेत्रामधून 30 टन खरबुजाचे उत्पादन मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे.

इतकेच नाहीतर अवघ्या तीन महिन्यांमध्ये सुमारे 12 लाखांचे उत्पन्न मिळण्याचा विश्वास देखील त्यांना आहे. नक्कीच या यशामागे किंवा या खरबुजाच्या यशस्वी उत्पादन घेण्यामध्ये त्यांचे प्रचंड असे कष्ट तसेच योग्य नियोजन व व्यवस्थापन कारणीभूत ठरले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe