सहज आणि पटकन मिळते परवडणारे ‘हे’ लोन! इमर्जन्सीमध्ये ताबडतोब होते पैशांची व्यवस्था

बऱ्याचदा आयुष्यामध्ये एखादी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते व त्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर पैशांची आवश्यकता असते व लागणाऱ्या पैशांची गरज पूर्ण करता येईल इतका पैसा आपल्याकडे तेव्हा नसतो. अशाप्रसंगी साहजिकच पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्डचा वापर केला जातो.

Ajay Patil
Published:
overdraft

Bank Overdraft Facility:- बऱ्याचदा आयुष्यामध्ये एखादी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते व त्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर पैशांची आवश्यकता असते व लागणाऱ्या पैशांची गरज पूर्ण करता येईल इतका पैसा आपल्याकडे तेव्हा नसतो. अशाप्रसंगी साहजिकच पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्डचा वापर केला जातो.

नाहीतर मित्र किंवा नातेवाईकांकडून कर्जरूपाने किंवा हातउसने पैसे घेण्याकडे कल असतो. परंतु या पद्धतीने घेतलेले कर्ज वेळेवर मिळेल याची कुठलाही प्रकारची शाश्वती मात्र नसते. तसेच काही कर्ज प्रकारामध्ये बऱ्याच कागदपत्रांची पूर्तता करावी लागते व यामध्ये बराच वेळ जाण्याची शक्यता देखील असते.

त्यामुळे या कर्ज प्रकारां व्यतिरिक्त जर तुम्ही आणखी एका कर्जप्रकाराचा पर्याय निवडू शकता व हा कर्जाचा पर्याय अतिशय फायद्याचा ठरतोच परंतु परवडणारा देखील आहे. आजकाल प्रत्येकाचे बँकेत बचत खाते असते व या माध्यमातून बँक आपल्याला अनेक प्रकारच्या सेवा पुरवत असते व या माध्यमातूनच पैशांची सहज व्यवस्था केली जाऊ शकते.

अशाप्रकारे बँकेकडून मिळणाऱ्या सुविधांमध्येच बँकेची ओव्हर ड्राफ्ट सुविधा खूप फायद्याची ठरते व ही एक आर्थिक सुविधा असून यामध्ये जर तुम्हाला बँकेने मंजुरी दिली तर तुम्ही तुमच्या खात्यातून तुमच्या शिल्लक बॅलन्स पेक्षा जास्तीची रक्कम काढू शकता व तुमची पैशांची गरज भागवू शकता.

कसे आहे ओव्हरड्राफ्ट सुविधेचे स्वरूप?
ओव्हरड्राफ्ट हा एक प्रकारे कर्जाचा प्रकार असून बऱ्याच बँकांच्या माध्यमातून सॅलरी अकाउंट किंवा एफडी तसेच चालू खाते म्हणजेच करंट अकाउंट यावर ही सुविधा दिली जाते. ओव्हरड्राफ्टच्या माध्यमातून जी रक्कम घेतली जाते ती ठराविक कालावधीत परत करणे गरजेचे असते.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यावर व्याजाची गणना दैनंदिन आधारावर केली जाते. ओव्हरड्राफ्ट सुविधा अंतर्गत तुम्हाला किती रक्कम मिळेल याची मर्यादा ही बँकांच्या माध्यमातून ठरवली जाते. उदाहरणार्थ तुम्ही जर तुमचे पगार खाते म्हणजेच सॅलरी अकाउंटवर ओव्हरड्राफ्ट सुविधा घेतली तर तुम्हाला मिळत असलेल्या पगाराच्या दुप्पट किंवा तिप्पट रक्कम तुम्हाला कर्ज म्हणून मिळते.

परंतु अशाप्रकारे तुम्हाला जर सॅलरी अकाउंट वर ओव्हरड्राफ्ट घ्यायचा असेल तर तुमचे ज्या बँकेत पगार खाते आहे त्याच बँकेतून तुम्हाला ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळते.

पर्सनल लोनपेक्षा परवडते ओव्हरड्राफ्ट सुविधा
जर आपण पर्सनल लोन घेतले तर पर्सनल लोन म्हणून जी रक्कम मंजूर होते त्या संपूर्ण रकमेवर व्याजाची गणना किंवा व्याज मोजले जाते. परंतु ओव्हरड्राफ्ट सुविधेमध्ये हा प्रकार होत नाही. या सुविधेमध्ये बँकेने मंजूर केलेली जी रक्कम असते त्यावर तुम्हाला व्याज भरावे लागत नाही. तुम्ही तुमच्या खात्यातून जेवढी रक्कम काढतात त्या रकमेवरच व्याज भरावे लागते.

उदाहरणार्थ बँकेने जर तुम्हाला दोन लाख रुपये मर्यादा निश्चित केली असेल आणि तुम्ही त्या दोन लाख मधून एक लाख रुपये खर्च केले तर एक लाखावर तुम्हाला व्याज भरावे लागते. परंतु जर तुम्ही पर्सनल लोन दोन लाख रुपये घेतले असेल तर तुम्हाला संपूर्ण दोन लाखानुसार व्याज भरावे लागते.

इतकेच नाहीतर ओव्हरड्राफ्ट मध्ये जितक्या कालावधी करिता तुमच्याकडे रक्कम आहे त्यासाठीच व्याज आकारले जाते. म्हणजे तुम्ही जितक्या लवकरात लवकर कर्ज परतफेड कराल तितक्या लवकर तुमची या कर्जामधून सुटका देखील होते.तसेच पर्सनल लोन किंवा इतर प्रकारचे कुठलेही लोन जर तुम्ही घेतले तर तुम्हाला प्रक्रिया शुल्क देणे गरजेचे असते.

परंतु ओव्हरड्राफ्ट सुविधेमध्ये तुम्ही कर्ज घेतले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रक्रिया शुल्क भरावे लागत नाही. तसेच तुम्ही जर ओव्हरड्राफ्ट मधून घेतलेल्या कर्जाची जर लवकर परतफेड केली तर तुम्हाला प्री पेमेंट शुल्क भरावे लागत नाही. याउलट तुम्ही जर पर्सनल लोन वेळेआधी परतफेड केले किंवा बंद करायचे ठरवले तर तुम्हाला प्री पेमेंट चार्ज द्यावा लागतो.

ओव्हरड्राफ्ट सुविधेमध्ये तुम्हाला तुमची एफडी, इन्शुरन्स पॉलिसी, तुमच्याकडे शेअर्स असतील तर शेअर्स किंवा सॅलरी किंवा बॉण्ड्स इत्यादी तारण ठेवावे लागते. समजा काही कारणाने तुम्ही घेतलेली रक्कम परतफेड करू शकला नाहीत तर बँक या माध्यमातून त्यांच्या रकमेची भरपाई करू शकते. अशाप्रकारे ओव्हरड्राफ्ट सुविधेतून घेतलेले कर्ज हे फायद्याचे ठरते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe