नगरमध्ये महापालिका निवडणुकीची तयारी सुरु ! माजी महापौर संदीप कोतकर यांची मोर्चेबांधणी; संदीपदादा कोतकर विचारमंच पुन्हा ऍक्टिव्ह

माजी महापौर संदीप कोतकर यांनी देखील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी सुरू केली आहे. केडगाव मध्ये संदीप दादा कोतकर विचारमंच पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाला आहे. कोतकर यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केडगाव मध्ये घरोघरी जात मतदार नोंदणीचे काम सध्या सुरू असल्याचे चित्र आहे.

Mahapalika News

Mahapalika News : गेल्या पाऊणे तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लवकरच होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचे संकेत नुकतेच दिलेत. यामुळे सध्या सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू असल्याचे चित्र आहे. ज्या महापालिकांवर प्रशासक नियुक्त आहे त्या महापालिकांच्या निवडणुका 2025 मध्ये होतील असे चित्र आहे.

खरे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बाबतीत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून पुढील वर्षी अगदी सुरुवातीलाच या याचिकांवर निर्णय होण्याची शक्यता आहे. हा निर्णय झाला की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील.

न्यायालयाचा निर्णय लागल्यानंतर साधारणतः तीन महिन्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात असा एक अंदाज आहे. दरम्यान याच साऱ्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी विविध पक्षांनी तयारी सुरू केली आहे.

माजी महापौर संदीप कोतकर यांनी देखील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी सुरू केली आहे. केडगाव मध्ये संदीप दादा कोतकर विचारमंच पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाला आहे. कोतकर यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केडगाव मध्ये घरोघरी जात मतदार नोंदणीचे काम सध्या सुरू असल्याचे चित्र आहे.

खरेतर केडगाव हा कोतकर यांचा बालेकिल्ला. कोतकर यांना मानणारा एक मोठा गट इथं आहे. यामुळे या भागात मतदार नोंदणीचे अभियान त्यांच्या गटाकडून सुरू करण्यात आले असून यावेळी पुन्हा महापालिकेची सत्ता आपल्याकडे खेचून आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

कोतकर यांना मागील निवडणूक काही कारणास्तव लढवता आली नाही. यावेळी मात्र कोतकर गट पूर्ण ताकतीने निवडणुकीत उतरणार आहे. यासाठी कोतकर गटाची पूर्वतयारी सुरू देखील झाली आहे. केडगाव मधील सर्व जागा जिंकायच्या, असा चंग त्यांनी बांधला आहे.

मात्र बदललेली राजकीय परिस्थिती पाहता कोतकर गटाला पूर्ण जागा जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. यासाठीच संदीप दादा कोतकर विचार मंच पुन्हा एकदा सक्रिय झाला असून डोअर टू डोअर कॅम्पेनच्या माध्यमातून मतदार नोंदणी अभियान राबवले जात आहे. केडगाव मध्ये सध्या 33 हजार मतदार आणि दोन प्रभाग आहेत.

एका प्रभागात चार नगरसेवक अशा तऱ्हेने दोन प्रभागात आठ नगरसेवक हे जुने सूत्र समोर ठेवून आपले हक्काचे मतदार वाढवण्यासाठी कोतकर गटाने हे अभियान सुरू केलेले आहे. एकंदरीत अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीत कोतकर गट सक्रिय असल्याने पुढील वर्षी होणाऱ्या या निवडणुकीत चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe