पुणे ते धुळे अन मुंबई ते धुळे वंदे भारत एक्सप्रेस सुरु होणार का ? केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्टचं सांगितलं

खासदार महोदयांनी धुळे ते पुणे आणि धुळे ते मुंबई अशी वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली पाहिजे अशी आग्रही मागणी करत या वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास प्रवाशांना काय फायदा होणार याबाबत रेल्वेमंत्री यांना पटवून दिले होते. दरम्यान खासदार शोभा बच्छाव यांचा पाठपुरावा लवकरच यशस्वी होऊ शकतो असे चित्र आता दिसते.

Published on -

Pune To Dhule And Mumbai To Dhule Vande Bharat Train : धुळ्याच्या नवनिर्वाचित खासदार शोभा बच्छाव यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत धुळ्याला दोन वंदे भारत एक्सप्रेस मिळायला हव्यात अशी आग्रही मागणी केली होती.

खासदार महोदयांनी धुळे ते पुणे आणि धुळे ते मुंबई अशी वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली पाहिजे अशी आग्रही मागणी करत या वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास प्रवाशांना काय फायदा होणार याबाबत रेल्वेमंत्री यांना पटवून दिले होते.

दरम्यान खासदार शोभा बच्छाव यांचा पाठपुरावा लवकरच यशस्वी होऊ शकतो असे चित्र आता दिसते. कारण की रेल्वेमंत्री महोदयांनी खासदार शोभा बच्छाव यांच्या या मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे यासाठी त्यांनी आवश्यक कारवाई सुद्धा सुरू केलेली आहे.

शोभा बच्छाव यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली त्यावेळी पुणे ते धुळे आणि मुंबई ते धुळे यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरु करावी अशी आग्रही मागणी केली आणि या मागणीवर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांनी सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही दिली.

नव्या वर्षात अर्थातच 2025 मध्ये या संदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले होते. दरम्यान आता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी 17 डिसेंबर 2024 रोजी खासदार शोभा बच्छाव यांना एक पत्र पाठवले आहे.

या पत्रात अश्विनी वैष्णव यांनी “आपण दिलेल्या 9 डिसेंबर आणि 11 डिसेंबर 2024 रोजी च्या पत्रासाठी धन्यवाद ! तुमच्या पत्रात नमूद केलेल्या धुळे ते मुंबई आणि पुणे या नवीन वंदे भारत गाड्या चालवण्याबाबत सविस्तर चौकशी करण्याच्या सूचना संबंधित संचालनालयाला देण्यात आल्या आहेत”,

असं म्हणतं पुणे ते धुळे आणि मुंबई ते धुळे या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. यामुळे भविष्यात धुळ्याला दोन वंदे भारत एक्सप्रेस मिळू शकतात अशी आशा आता बळावली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News