नागपूर-मडगाव एक्सप्रेस ट्रेनला राज्यातील ‘या’ स्थानकावर थांबा मंजूर !

नागपूर-मडगाव एक्सप्रेस ट्रेनला सावंतवाडी रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. खरेतर, कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून या एक्सप्रेस ट्रेन ला सावंतवाडी रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता.

Tejas B Shelar
Published:
Railway News

Railway News : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे या रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एका एक्सप्रेस ट्रेन ला एक अतिरिक्त थांबा मंजूर करण्यात आला आहे. नागपूर-मडगाव एक्सप्रेस ट्रेनला सावंतवाडी रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

खरेतर, कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून या एक्सप्रेस ट्रेन ला सावंतवाडी रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. या संघटनेने या संदर्भात खासदार नारायण राणे यांच्याकडे पाठपुरावा करत त्यांचे लक्ष वेधण्यात आले होते.

त्यानंतर मग या गाडीला सावंतवाडी येथे थांबा मिळावा यासाठी खासदार राणे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. खा. नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन या गाडीला सावंतवाडीला थांबा मिळावा अशी आग्रही मागणी केली.

दरम्यान, आता याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. कारण की, नागपूर मडगाव एक्सप्रेस ट्रेन ला सावंतवाडी येथे थांबा मंजूर करण्यात आला आहे. याबाबत, कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने खासदार नारायण राणे यांचे आभार सुद्धा मानले आहेत.

खरंतर नागपूर मडगाव एक्सप्रेस ट्रेन गेल्या काही वर्षांपूर्वी सावंतवाडी मध्ये थांबा घेत होती. या गाडीला सावंतवाडी मध्ये थांबा होता यामुळे या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा देखील मिळत होता.

महत्त्वाची बाब म्हणजे सावंतवाडी रेल्वे स्थानकावरून या गाडीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता. या स्थानावरून अपेक्षित प्रवासी संख्या आणि उत्पन्न असताना देखील या गाडीचा सावंतवाडीचा थांबा रद्द करण्यात आला. ही गाडी काही वर्षापूर्वी या स्थानकात थांबत होती.

सावंतवाडी स्थानकातून अपेक्षित प्रवासी संख्या आणि उत्पन्न या गाडीतून मिळत असताना देखील या गाडीचा सावंतवाडी मधील थांबा रद्द करण्यात आला होता. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यानंतर प्रवासी संघटनेचा सातत्याने याबाबत पाठपुरावा सुरू होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe