5 लाख भांडवलातून सुरू झालेला रेडबसचा प्रवास आज पोहोचला कोट्यावधीच्या घरात! जाणून घ्या कशी झाली सुरुवात?

कधी कधी एखादी छोटीशी कल्पना फार मोठ्या गोष्टीला जन्म देत असते. फक्त कल्पनेला मूर्त स्वरूप देणे किंवा वास्तवात उतरवणे खूप गरजेचे असते व त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर मेहनत घ्यावी लागते आणि कल्पना सत्यात उतरेपर्यंत जिद्दीने त्या दिशेने व्यक्तीला प्रवास करावा लागतो व तेव्हा कुठे कल्पना या वास्तव स्वरूपामध्ये उतरतात.

Ajay Patil
Published:
phanindra sama

Business Success Story:- कधी कधी एखादी छोटीशी कल्पना फार मोठ्या गोष्टीला जन्म देत असते. फक्त कल्पनेला मूर्त स्वरूप देणे किंवा वास्तवात उतरवणे खूप गरजेचे असते व त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर मेहनत घ्यावी लागते आणि कल्पना सत्यात उतरेपर्यंत जिद्दीने त्या दिशेने व्यक्तीला प्रवास करावा लागतो व तेव्हा कुठे कल्पना या वास्तव स्वरूपामध्ये उतरतात.

एखाद्या व्यक्ती छोटीशी स्वप्न बघतो आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आवश्यकता सर्व गोष्टी करतो व मोठ्या प्रयत्न व मेहनतीच्या सातत्यानंतर स्वप्न पूर्ण होत असतात. यास मुद्द्याला धरून जर आपण अनेक व्यावसायिक बघितले तर आपल्याला या मुद्द्याची अनुभूती येऊ शकते.

आपल्याला सगळ्यांना माहिती असलेल्या रेडबसचा प्रवास जर बघितला तर तो काहीसा असाच आहे. फनींद्र सामा यांना सणासुदीच्या वेळी घरी जाताना बसचे तिकीट बुकिंग करताना खूप मोठ्या समस्या आल्या व या समस्यातूनच त्यांना रेडबस या सर्वात मोठ्या ऑनलाईन बस तिकिटं कंपनीची कल्पना सुचली. आज या कंपनीचे साम्राज्य जवळपास कोटींच्या घरात आहे.

कसा सुरू झाला रेडबसचा प्रवास?
फणींद्र सामा हे मूळचे तेलंगणा राज्यातील निजामाबादचे रहिवासी आहेत व त्यांनी इंजिनिअरिंग पूर्ण केली व इतरांप्रमाणे नोकरी शोधायला त्यांनी सुरुवात केली. परंतु मनामध्ये स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करावा हे निश्चित होते व त्या दिशेने त्यांचे प्रयत्न सुरूच होते. या सगळ्या विचारत असताना एकदा त्यांना सणांच्या कालावधीमध्ये घरी जायचे होते.

परंतु त्यावेळी बसचे तिकीट बुक करताना अनेक प्रकारच्या समस्या त्यांना आल्या व तेव्हा त्यांच्या मनामध्ये आले की अशा प्रकारच्या समस्या तिकीट बुकिंग करताना येऊ नये याकरिता काय करता येईल व त्यातूनच त्यांना ही कल्पना सुचली.

याबद्दल विचार करत असताना त्यांना समजले की तिकीट बुकिंग विषयीच्या अनेक समस्या लाखो लोकांना आहेत व त्यामुळे तिकीट बुकिंगचीच प्रक्रिया ऑनलाईन आणि सुलभ जर केली तर सगळ्यांना फायदा होईल हा विचार सामा यांच्या मनामध्ये आला व त्यांनी याबाबत त्यांच्या मित्रांशी चर्चा केली.

त्यानंतर सामा यांचे कॉलेजचे मित्र सुधाकर पसूपुनुरी आणि चरण पद्माराजू असे तिघे मिळून यांनी पाच लाखाचे भांडवल उभे केले व रेडबस ऑनलाइन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्मचा श्रीगणेशा केला. परंतु हा प्रवास खूपच अवघड होता. परंतु जबर इच्छाशक्ती व मजबूत टीमवर्कच्या बळावर त्यांनी हा व्यवसाय आज यशाच्या शिखरावर पोचवला आहे.

साधारणपणे 2006 मध्ये तिघे मित्र मिळून रेड बसची सुरुवात केली व अगदी सुरुवातीपासूनच रेडबसला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळायला लागला होतील व ते लोकप्रिय झाले. रेड बसच्या माध्यमातून लोकांना एका क्लिकवर बसची तिकिटे बुक करता येणे शक्य झाले.

अशाप्रकारे यशाच्या शिखरावर आहे रेडबस
अगोदर बसचे तिकीट जर बुक करायचे राहिले तर तासंतास रांगेमध्ये उभे राहायला लागायचे व तिकीट घ्यावे लागत होते. परंतु आता रेडबसच्या माध्यमातून ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू झाल्यामुळे एका क्लिकवर तिकीट बुकिंग करणे शक्य झाले त्यामुळे झपाट्याने लोकांमध्ये रेडबस लोकप्रिय होऊन प्रगती देखील वेगात झाली.

रेडबसला पहिला निधी 2007 मध्ये मिळाला व त्यानंतर कंपनीचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला. 2013 मध्ये ईबिबो ग्रुपने रेड बसचे अधिग्रहण 828 कोटींमध्ये केले.

परंतु त्यानंतर देखील सामा यांनी कंपनीच्या विस्तारामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली व रेडबसला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचवले.आज रेडबस जगातील सर्वात मोठी ऑनलाईन बस तिकिटिंग कंपनी असून फनींद्र सामा या कंपनीचे संस्थापक आहेत. आज सामा हे रेडबस सोबत सबसेक आणि निजामाबाद येथील काकतीय सॅंडबॉक्सचे देखील संस्थापक आहेत.

यावरून आपल्याला दिसून येते की तुमच्या मनामध्ये जर इच्छाशक्ती असेल आणि एखादा व्यवसाय पुढे नेण्यासाठीची परफेक्ट अशी प्लॅनिंग असेल व त्यासोबत कष्टाची जोड मिळाली तर कुठलाही व्यवसाय ताबडतोब यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe