Ahilyanagar News : राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यातील विविध शहरांमधील क्राईम रेट मोठ्या प्रमाणात वाढला असून हा क्राईम रेट कमी करण्यासाठी शासन आणि प्रशासन कटिबद्ध आहे. याचाच एक भाग म्हणून अहिल्यानगर मध्ये चौका-चौकात सीसीटीव्ही बसवण्यात आले असून याचा फायदा म्हणून अहिल्यानगर मधील क्राईम रेट मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. दिवसाढवळ्या आणि रात्री अपरात्री होणाऱ्या चोऱ्या, गुंडागर्दी, चैन स्नॅचिंग, खून, हाणामारी सारख्या घटना बऱ्यापैकी कमी झाल्या असून यासाठी सीसीटीव्हीचा मोठ्या प्रमाणात उपयोग झाला आहे.
गुन्हेगारीची घटना घडल्यानंतर पोलिसांना तात्काळ घटनास्थळी जाता येते यामुळे गुन्हेगारीवर आळा बसला आहे. अहिल्यानगर शहर व परिसरातील अनेक प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. शहरातील व परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हे सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत.
पहिल्या टप्प्यात 51 चौकात आणि गेल्या वर्षीच्या शेवटी शेवटी 51 चौकात सीसीटीव्ही बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. म्हणजे सध्या शहरातील 102 चौकांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. प्रत्येक चौकात एकूण चार सीसीटीव्ही बसवण्यात आले असून शहरातील सीसीटीव्हीची संख्या आता 432 वर पोहोचली आहे. शहरात बसवण्यात आलेल्या या बुलेट सीसीटीव्हीमुळे कितीही भरधाव वेगाने वाहने धावली तरी देखील त्यांचा नंबर ट्रॅक करता येतो.
पोलिसांना फिजिकली 24 तास पेट्रोलिंग करता येणे शक्य नाही मात्र सीसीटीव्ही मुळे ही गोष्ट साध्य करता आली आहे. पोलिसांची अहिल्यानगर शहर आणि आजूबाजूच्या परिसरात सीसीटीव्हीच्या माध्यमातून 24 तास करडी नजर आहे. यामुळे शहरातील आणि परिसरातील गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले असून नागरिकांनी प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
शहरात आणि परिसरात मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही बसवण्यात आले असल्याने एका स्क्रीनवर संपूर्ण शहरातील दृश्य पोलिसांना पाहता येते. शहरात बसवण्यात आलेले हे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षाशी जोडलें गेले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात यासाठी एक मोठी स्क्रीन आहे.
या स्क्रीनवर शहरातील 102 चौकांमध्ये कोणत्या क्षणी काय घडले याची संपूर्ण माहिती पोलिसांना मिळते. त्यामुळे पोलिसांना छोट्या-मोठ्या सर्वच गुन्हेगारांवर लक्षात ठेवता येत आहे. गुन्हेगारांच्या पोलिसांनी अक्षरशः मुसक्या आवळल्या आहेत. आता आपण शहरातील कोणकोणत्या चौकांमध्ये सीसीटीव्हीची करडी नजर आहे याबाबत माहिती पाहूयात.
पहिल्या टप्प्यात या ठिकाणी बसवलेत सीसीटीव्ही
कायनेटिक चौक, सक्कर चौक, रेल्वे स्टेशन, शिवाजी चौक, मार्केटयार्ड, पाटील हॉस्पिटल, चांदणी चौक, एसबीआय चौक, कोठला, मुकुंदनगर, गजराजनगर, शेंडी चौक, आयुर्वेद कॉर्नर, नेप्तीनाका, दिल्लीगेट, नीलक्रांती चौक, अप्पू हात्ती चौक, भूतकरवाडी, लालटाकी, रेणुकामाता मंदिर, सह्याद्री चौक, चाणक्य चौक, महात्मा फुले चौक, मर्चट बैंक,
जुने मनपा कार्यालय, सबजेल चौक, अशा टॉकीज, कापडबाजार, पंचपीर चावडी, सर्जेपूरा, तेलीखुंट, तेलीखुंट पॉवर हाऊस, मंगलगेट पोलिस चौकी, मीरावली दर्गा, कोंड्यामामा चौक, मच्छी मार्केट, राऊत हॉस्पिटल, झेंडीगेट, रामवाडी, रामचंद्र खुंट, बॉम्बे बेकरी, तारकपूर बसस्टँड, फुलसौंदर चौक, पारिजात चौक, श्रीराम चौक, एकवीरा चौक.
दुसऱ्या टप्प्यात या चौकांमध्ये बसवलेत सीसीटीव्ही
सुरभी हॉस्पिटल, हॉटेल इंद्रायणी चौक, भिंगार चौक, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, हातमपुरा चौक, धर्ती चौक, ईदगाह मैदान, सीटी लॉन चौक, भिस्तबाग महाल, हॉटेल राजवीर, पद्मावतील चौक, बोल्हेगाव चौक, डॉ. आंबेडकर चौक, नटराज हॉटेल, पत्रकार चौक, जिवबा महाले चौक, सावेडीनाका, वाकळे पाटील चौक, नायरा पेट्रोल पंप चौक, डीएसपी चौक,
चांद सुल्ताना चौक, गंगा उद्यान चौक, सिद्धार्थ चौक, कल्याण बायपास, पुणे बायपास, केडगाव, केडगाव वेस, हॉटेल रंगोली, मल्हार चौक, स्वीट कॉर्नर चौक, स्वस्तिक चौक, नवीपेठ, शिवाजी चौक, अमरधाम, गांधी मैदान, झेंडीगेट, आनंदधाम, नालबंद खुंट, सोनानगर चौक, हॉटेल सिटी प्राईड, सोनार गल्ली.