पदाधिकारी व कार्यकर्त्यामुळे विधानसभेला यश : आ. राजळे

Mahesh Waghmare
Published:

२ जानेवारी २०२५ शेवगाव : पक्षाचे पदाधिकारी व कार्यकत्यांनी प्रामाणिकपणे काम केल्यामुळे विधानसभा निवडणुकीत आपल्या मतदारसंघाबरोबरच पक्षाला राज्यात मोठे यश मिळाले असल्याचे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.

शेवगाव येथे आयोजित भाजप सदस्य नोंदणी कार्यशाळेत त्या बोलत होत्या. या वेळी ज्येष्ठ नेते बापुसाहेब भोसले, युवा मोर्चा अध्यक्ष महेश फलके, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष उमेश भालसिंग, भाजपा जिल्हा सरचिटणीस गंगा खेडकर, महिला आघाडीच्या आशाताई गरड, कचरू चोथे, कासम शेख, नगरसेवक सागर फडके, नितीन दहिवाळकर,केशव आंधळे, राजाभाऊ लड्डा, शिवाजीराव भिसे, उषाताई संतोष कंगणकर, मिनाताई कळकुंबे, सुरेश नेमाणे, मयूर हुंडेकरी

राहुल बंब, शरद चाबुकस्वार, उमेश धस, रामकाका केसभट, सहदेव खेडकर, राजेंद्र डमाळे, संभाजी काटे, भाऊसाहेब मुरकुटे, अभय गोरे, नारायण मडके, अशोक खिळे, विक्रम बारवकर, बाळासाहेब आव्हाड, सुरेश आव्हाड, रामकिसन तापडिया, महादेव पवार, सुभाषराव बडधे, सुरेश बडे, मुस्साभाई शेख, सोमनाथ कळमकर, मोहन डमाळे आदीसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, बुथ प्रमुख व शक्तीकेंद्र प्रमुख उपस्थित होते.

आ.राजळे पुढे म्हणाल्या, भारतीय जनता पार्टी पदाधिकारी, कार्यकर्ते निरंतर जनतेच्या सेवेशी तत्पर असतात, त्यामुळे पक्ष संघटनेला यश मिळाले आहे,
निवडणुका आल्यानंतर नाही तर हे पक्ष संघटनेचे कार्य निरंतर चालू असते.आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच नगरपरिषद निवडणुकीत आपल्याला पुन्हा एकदा जोमाने काम करून सर्वसामान्यांसाठी काम करणारे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी निवडून द्यायचे आहेत.

याकरिता प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपल्या बुथवर किमान २०० सदस्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे.पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रत्येक घटकातील प्रत्येक व्यक्तीला पक्षाशी जोडण्यासाठी प्रयत्न करावा.

आपल्या तालुक्यात सर्वाधिक सदस्यता नोंदणी करून त्यांना भारतीय जनता पार्टीशी जोडावे.प्रथम देश, नंतर पक्ष व शेवटी स्वतः चा विचार करणाऱ्या पक्षाशी जोडले जाणे हे एक प्रकारचे राष्ट्र निर्मितीचेच कार्य आहे. सूत्रसंचालन भिमराज सागडे यांनी केले.प्रास्ताविक कैलास सोनवणे यांनी केले.आभार एकनाथ खोसे यांनी मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe