स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कटिबद्ध होत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सदस्य नोंदणी करावी ; आ. विक्रम पाचपुते यांचे प्रतिपादन

Sushant Kulkarni
Published:

२ जानेवारी २०२५ नगर : एक काळ असा होता भाजपचा एकही आमदार जिल्ह्यात नव्हता.परंतु आज चित्र पूर्णपणे बदलले आहे.या यशाचे सर्व श्रेय फक्त पक्षाच्या कार्यकत्यांनाच जाते.पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने व कार्यकर्त्याने विधानसभा निवडणूकीत भाजपच्या उमेदवाराला बळ देत निष्ठेने काम केल्यानेच जिल्ह्यात महायुतीला मोठे यश मिळाले आहे.

आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत.यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व सर्व कार्यकत्यांनी कटीबद्ध होत तयारीला लागावे. प्रवाह बरोबर अनेकजण पक्षात येत असतात. जो कोणी येईल त्यासाठी दारे उघडे आहेत परंतु जो पक्ष निष्ठेने काम करतो त्यालाच संधी मिळाली पाहिजे.

अहिल्यानगर शहरात २९७ बुथ आहेत.प्रत्येक बुथवर दोनशे सभासदाप्रमाणे सदस्य नोंदणी केल्यास जवळपास ६० हजार सदस्य नोंदणी अपेक्षित आहे. त्यापेक्षा जास्त सभासद नोंदणी करून उच्चांक करून दाखवू, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करूया, असे प्रतिपादन श्रीगोंदाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी केले.

अहिल्यानगर शहर भारतीय जनता पार्टीच्या सुरु असलेल्या सदस्य नोंदणी अभियाना अंतर्गत आयोजित पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेचे उद्घाटन आ. विक्रम पाचपुते यांनी महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने केले.

पेमराज सारडा महाविद्यालायात झालेल्या या कार्यशाळेस शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर, सरचिटणीस सचिन पारखी व प्रशांत मुथा, प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रा. भानुदास बेरड, ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, वसंत लोढा, अनिल मोहिते, महेश नामदे, दामोदर बठेजा, पंडित वाघमारे, मयूर बोचूघोळ, माजी महापौर बाळासाहेब वाकळे, बाबासाहेब सानप, अशोक गायकवाड, नितीन शेलार, राहुल जामगावकर, सुवेंद्र गांधी, बाळासाहेब गायकवाड, संजय ढोणे

धनंजय जाधव, महेश तवले, अजय चितळे, साहिल शेख, नरेंद्र कुलकर्णी, बंटी डापसे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.आ. पाचपुते पुढे म्हणाले, सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची आज भारतातच नव्हे तर जगात वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

सर्व सामान्य कार्यकर्ता हीच खरी पक्षाची ताकद असते.त्यांची ताकद मिळाल्यामुळे भाजपची आज ओळख आहे.तळागाळातील कार्यकर्ता मोठा व्हायला पाहिजे जो पक्षनिष्ठेने काम करतो,त्याला ताकद मिळाली पाहिजे,हा मूळ उद्देश सभासद नोंदणीचा आहे.पक्षाला अजून पाठबळ देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे असे आवाहन केले.

अभय आगरकर म्हणाले, कोणत्याही पक्षाला सत्ता टिकवायची असेल तर त्याचे संघटन बांधणी मजबूत असावी लागते. शहरात पक्षाची मोठी ताकद आहे. प्रत्येकाने जास्तीत जास्त सभासद नोंदणी स्वबळावर करावी. महाराष्ट्र हा सभासद नोंदीमध्ये देशात अग्रेसर राहील, अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

त्यांना आपल्याला पाठबळ द्यायचे आहे.यासाठी सर्व बूथ प्रमुखांनी प्रत्येक घरोघरी जाऊन हे अभियान राबवावे.याप्रसंगी सचिन पारखी, वसंत लोढा, प्रा. भानुदास बेरड, महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रिया जानवे, विवेक नाईक आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अशोक गायकवाड यांनी केले.आभार महेश नामदे यांनी मानले

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe