स्वतःसाठी वेळ काढा आणि नवीन वर्षात नक्कीच ‘या’ आरोग्य तपासण्या करा! मोठ्या प्रमाणावर रहाल फायद्यात

आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जर आपण बघितले तर प्रत्येक व्यक्ती हा कामाच्या धावपळीत असतो आणि दैनंदिन रुटीनच्या जाळ्यामध्ये व्यक्ती इतका अडकून पडतो की त्याला स्वतःच्या शरीराकडे म्हणजेच आरोग्याकडे देखील लक्ष द्यायला वेळ नसतो.

Ajay Patil
Published:
health check up

Health Check-Up:- आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जर आपण बघितले तर प्रत्येक व्यक्ती हा कामाच्या धावपळीत असतो आणि दैनंदिन रुटीनच्या जाळ्यामध्ये व्यक्ती इतका अडकून पडतो की त्याला स्वतःच्या शरीराकडे म्हणजेच आरोग्याकडे देखील लक्ष द्यायला वेळ नसतो.

तसेच खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी आणि अशा प्रकारचे धावपळीच्या जीवनशैलीमुळे ताण तणाव व त्यामुळे मानसिक स्थितीवर परिणाम होऊन अनेक शारीरिक आजारांनी व्यक्ती ग्रस्त होऊ शकतो. शरीरामध्ये एखाद्या वेळेस अगदी छोटीशी समस्या निर्माण होते.

परंतु त्याकडे आपण दुर्लक्ष केल्यामुळे ती समस्या नंतर उग्र स्वरूप धारण करते व आपल्याला पश्चाताप करायची वेळ येते. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे.

तुम्ही निरोगी असाल तरच तुम्ही जीवनातील तुमचे सगळी कामे चांगल्या प्रकारे करू शकाल व जीवनाचा आनंद देखील घेऊ शकाल. त्यामुळे तुमच्या सगळ्या धावपळीतून स्वतःसाठी थोडा वेळ काढून जर तुम्ही काही हेल्थ चेकअप म्हणजेच आरोग्य चाचण्या केल्या तर तुम्हाला नक्कीच याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो.

या पाच आरोग्य तपासण्या तुमच्यासाठी ठरतील फायद्याच्या

1- सीबीसी अर्थात संपूर्ण रक्ताची चाचणी- ही टेस्ट म्हणजेच ही चाचणी एक साधी चाचणी असून या चाचणीच्या माध्यमातून आपल्याला रक्तातील लाल रक्त पेशींचे प्रमाण तसेच पांढऱ्या रक्त पेशी आणि प्लेटलेट्सची संख्या किती आहे हे समजण्यास मदत होते. या प्रकारच्या टेस्टमुळे अशक्तपणा तसेच एखाद्या गोष्टीचा संसर्ग किंवा इतर अनेक आजार शोधण्यामध्ये मदत मिळू शकते.

2- ब्लड शुगर टेस्ट- या चाचणीच्या माध्यमातून रक्तातील साखरेची पातळी किती आहे हे आपल्याला कळते. या चाचणीमुळे डायबिटीसचा संभाव्य धोका आपल्याला ओळखता येतो.

सगळ्यांना माहिती आहे की मधुमेह म्हणजेच डायबिटीस हा एक घातक आणि गंभीर आजार असून जर वेळीच त्याचे निदान झाले नाही तर अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

3- ब्लड प्रेशर टेस्ट( रक्तदाब तपासणी)- हाय ब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाब याला सायलेंट किलर असे म्हटले जाते. ही समस्या उद्भवली तरी कुठलेही लक्षणे सहसा दिसून येत नाही.

त्यामुळे रक्तदाब नियमितपणे तपासणे खूप महत्त्वाचे आहे. उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार तसेच पक्षाघात आणि किडनीच्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे ही चाचणी खूप फायद्याची ठरते.

4- कोलेस्टेरॉल टेस्ट- आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोलेस्टेरॉल हा हृदयविकाराला कारणीभूत ठरणारा घटक आहे. शरीरामध्ये जर याचे प्रमाण जास्त झाले तर हृदयविकाराचा धोका वाढतो.

कोलेस्टेरॉल म्हणजेच रक्तात आढळणारी एक प्रकारची चरबी असते. त्यामुळे कोलेस्टेरॉल चाचणीच्या माध्यमातून याचे प्रमाण कळायला मदत होते व हृदयविकारापासून आपल्याला वाचता येते.

5- थायरॉईड टेस्ट- शरीरातील चयापचय प्रक्रिया नियंत्रित करण्यासाठी थायरॉईड ग्रंथी महत्वाची ठरते. थायरॉईडच्या समस्या अनेक प्रकारच्या असू शकतात. यामध्ये हायपरथायरॉइडिजम आणि हायपोथायरॉइडिजम असे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत.

यामध्ये थकवा जाणवणे तसेच वजनात वाढ होणे किंवा वजन कमी होणे, केस गळणे इत्यादी लक्षणे यामध्ये दिसू शकतात. त्यामुळे समस्या टाळण्याकरिता थायरॉईड टेस्ट करणे गरजेचे आहे.

हेल्थ चेकअप म्हणजेच आरोग्य तपासणी का आहे आवश्यक?
नियमितपणे आरोग्य तपासणी केली तर अनेक गंभीर आजार वेळेमध्ये ओळखले जातात व त्यावर सहजपणे उपचार होऊ शकतात. आरोग्य तपासणीचा जो काही रिपोर्ट येतो

त्यावरून तुमच्या जीवनात किंवा लाईफस्टाईलमध्ये कोणकोणत्या सुधारणा किंवा बदल आवश्यक आहेत हे कळते व त्यानुसार तुम्हाला बदल करता येतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नियमित आरोग्य तपासणी केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याबाबत व्यक्ती जागरूक होते व बिनधास्त व मजेत जीवन जगू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe