सापांची भीती वाटते का? मग ‘ही’ 5 रुपयांची वस्तू खिशात ठेवा, साप आजूबाजूलाही फिरकणार नाहीत

भारतात सापाच्या असंख्य प्रजाती आहेत आणि त्यातील फक्त चार प्रजातीच विषारी असल्याचा दावा सर्पमित्रांनी केलाय. म्हणजेच भारतात आढळणाऱ्या सर्व सापांच्या जाती विषारी नाहीत यामुळे साप दिसला की त्याला मारण्याचा प्रयत्न करू नका. साप दिसल्याक्षणी तुम्ही सर्पमित्राला बोलवा आणि तो साप रेस्क्यू करून निसर्गाच्या सानिध्यात सोडून द्या. पर्यावरणासाठी सापांची नितांत आवश्यकता आहे.

Tejas B Shelar
Published:
Snake Viral News

Snake Viral News : तुम्हालाही सापांची भीती वाटते ना? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची आहे. मंडळी, साप फक्त डोळ्याला दिसला तरी देखील थरकाप उडतो. कारण म्हणजे देशात आढळणाऱ्या सापाच्या काही प्रजाती विषारी आहेत. देशात सर्पदंशामुळे दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे सापांची भीती वाटणे स्वाभाविकच आहे.

भारतात सापाच्या असंख्य प्रजाती आहेत आणि त्यातील फक्त चार प्रजातीच विषारी असल्याचा दावा सर्पमित्रांनी केलाय. म्हणजेच भारतात आढळणाऱ्या सर्व सापांच्या जाती विषारी नाहीत यामुळे साप दिसला की त्याला मारण्याचा प्रयत्न करू नका. साप दिसल्याक्षणी तुम्ही सर्पमित्राला बोलवा आणि तो साप रेस्क्यू करून निसर्गाच्या सानिध्यात सोडून द्या.

पर्यावरणासाठी सापांची नितांत आवश्यकता आहे. जर पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर सापांच संवर्धन करणे आवश्यक आहे आणि यामुळे सापाला मारू नये. महत्त्वाचे म्हणजे साप विषारी असो अथवा बिनविषारी जर साप चावल्यानंतर संबंधित व्यक्तीला योग्य वेळेत योग्य उपचार मिळाले तर त्याचा जीव वाचू शकतो.

म्हणजे साप चावला तर माणूस लगेचच मरण पावतो असेही काही नाही त्याला फक्त योग्य वेळेत उपचार मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे साप चावल्यास त्या व्यक्तीला तातडीनं डॉक्टरकडे नेणं आवश्यक असते.

दरम्यान, जर तुम्हाला सापांची मोठ्या प्रमाणात भिती वाटत असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा एका वनस्पतींची माहिती सांगणार आहोत ज्या वनस्पतींच्या वासापासून साप नेहमी लांब राहतो. ही वनस्पती ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी साप फिरकत नाहीत असा दावा केला जातो.

असं म्हणतात की, सर्पगंधा ही औषधी वनस्पती सापांना दूर ठेवण्यासाठी गुणकारी आहे. सर्पगंधा एक औषधी वनस्पती असून या वनस्पतीचा वेगवेगळ्या उपचार पद्धतींमध्ये वापर होतो. सर्पगंधा वनस्पतीला तीव्र असा वास असतो. त्यामुळे ही वनस्पती जर तुमच्या घरात लावलेली असेल तर साप तिकडे फिरकत देखील नाही.

यामुळे जर तुम्हाला नेहमी घरात साप घुसणार अशी भीती वाटत असेल तुमचे घर जंगलात असेल तुम्ही शेतात राहत असाल तर अशा ठिकाणी तुम्ही ही वनस्पती लावू शकता यामुळे तुमच्या घराशेजारी साप फिरणार सुद्धा नाहीत. महत्वाचे म्हणजे या वनस्पतीची मुळे जर तुम्ही तुमच्या खिशात ठेवली तर साप तुमच्या जवळही येणार नाहीत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe