पत्नीच्या नावे FD करण्याऐवजी तुमच्या आईच्या नावाने एफडी करा मिळणार ‘हे’ जबरदस्त फायदे ! वाचा सविस्तर…

अनेकजण कर वाचवण्यासाठी आपल्या पत्नीच्या नावाने एफडी मध्ये पैसा गुंतवतात. पण आज आपण फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अशी माहिती घेऊन आलो आहोत ज्याच्या मदतीने गुंतवणूकदारांना आणखी चांगले बेनिफिट मिळू शकणार आहेत. तुम्हीही नवीन वर्षात गुंतवणूक सुरू करणार असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम टिप घेऊन आलो आहोत.

FD News

FD News : भारतात सुरक्षित गुंतवणुकीसाठी आजही फिक्स डिपॉझिटला म्हणजेच मुदत ठेव योजनेला पसंती दाखवली जाते. जर तुम्हीही नवीन वर्षात फिक्स डिपॉझिट मध्ये पैसा गुंतवण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरंतर फिक्स डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना बँकेच्या माध्यमातून अलीकडे चांगला परतावा दिला जातोय.

बड्या सरकारी तसेच प्रायव्हेट बँका एफडीवर गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा देत आहेत शिवाय स्मॉल फायनान्स बँका देखील आपल्या ग्राहकांना एफ डी वर चांगले व्याजदर ऑफर करत आहेत. यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिक एफडी मध्ये मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवत आहेत.

अनेकजण कर वाचवण्यासाठी आपल्या पत्नीच्या नावाने एफडी मध्ये पैसा गुंतवतात. पण आज आपण फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अशी माहिती घेऊन आलो आहोत ज्याच्या मदतीने गुंतवणूकदारांना आणखी चांगले बेनिफिट मिळू शकणार आहेत. तुम्हीही नवीन वर्षात गुंतवणूक सुरू करणार असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम टिप घेऊन आलो आहोत.

सामान्यतः असे दिसून येते की लोक त्यांच्या पत्नीच्या नावावर एफडी करतात. पण, जर तुम्ही तुमच्या पत्नीऐवजी तुमच्या आईच्या नावावर एफडी केली तर तुम्हाला मोठ्या व्याजासह इतर अनेक फायदे मिळू शकतात. आईच्या नावाने फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना कोणकोणते बेनिफिट मिळू शकतात याबाबत आता आपण डिटेल माहिती जाणून घेऊयात.

आईच्या नावाने एफडी केल्यास अधिकचे व्याज मिळणार

जर तुमच्या आईचे वय साठ वर्षांपेक्षा अधिक असेल तर तुम्ही तुमच्या पत्नी ऐवजी आईच्या नावाने एफडी करा. कारण की देशातील सर्वच बँका जेष्ठ नागरिकांना सामान्य ग्राहकांच्या तुलनेत अधिकचा परतावा देतात. जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर एफडी केली तर तुम्ही नक्कीच टॅक्स वाचवू शकता.

पण तुमच्या पत्नीच्या नावावर एफडी केली तर तुम्हाला जेवढे व्याज मिळेल तेवढेच व्याज तुमच्या पत्नीच्या नावाने एफडी केल्यास मिळणार आहे. दुसरीकडे, जर तुमच्या आईचे वय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल, तर तुम्हाला तुमच्या आईच्या नावावर केलेल्या एफडीवर 0.50 टक्के जास्त व्याज मिळेल.

एवढेच नाही तर तुमच्या आईचे वय 80 किंवा त्याहून अधिक असल्यास तुम्हाला 0.75 ते 0.80 टक्के जास्त व्याज मिळेल. याशिवाय एफडीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर टीडीएस कापला जातो. नियमांनुसार, जर एखाद्या आर्थिक वर्षात FD वरून मिळणारे व्याज 40,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 10% TDS भरावा लागेल.

तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा 50,000 रुपये आहे. म्हणजेच आईच्या नावावर FD करणे इथेही फायदेशीर ठरेल. एवढेच नाही तर तुम्ही तुमच्या आईच्या नावावर एफडी केल्यास तुमचा टॅक्सही वाचू शकतो. खरेतर, FD मधून मिळणारी कमाई तुमच्या एकूण कमाईमध्ये जोडली जाते.

अशा परिस्थितीत तुम्हाला अधिक कर भरावा लागेल. साधारणपणे, सामान्य कुटुंबातील बहुतेक स्त्रिया एकतर कमी कराच्या कक्षेत येतात किंवा गृहिणी असतात. उत्पन्न नसलेल्या गृहिणींना कोणताही कर भरावा लागत नाही. अशा तऱ्हेने तुम्ही तुमच्या पत्नी ऐवजी आईच्या नावाने एफडी मध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला अनेक बेनिफिट या ठिकाणी मिळणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe