FD News : अलीकडे गुंतवणूकदार मुदत ठेव योजनेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतायेत. मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना देशातील काही बँकांच्या माध्यमातून चांगले व्याज दिले जात आहे. आज आपण देशातील अशाच दोन बँकांची माहिती पाहणार आहोत जे की आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीवर सर्वाधिक व्याज परतावा देत आहेत.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक बँका त्यांच्या ग्राहकांना FD वर चांगला परतावा देत आहेत. ज्यामध्ये सरकारी, खाजगी आणि लघु वित्त बँकांच्या नावांचा समावेश आहे. या बँका त्यांच्या सामान्य ग्राहकांना एफडीवर वार्षिक ७ ते ९ टक्के दराने व्याज देत आहेत.
त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांना सामान्य लोकांपेक्षा सुमारे 0.5 टक्के अधिक परतावा दिला जात आहे. याशिवाय, या बँका त्यांच्या सुपर ज्येष्ठ नागरिकांना म्हणजेच 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ग्राहकांना 0.75 ते 0.80 टक्के अधिक परतावा देत आहेत.
म्हणून जर तुम्हालाही फिक्स डिपॉझिट मध्ये पैसा गुंतवायचा असेल तर आजची बातमी कामाची राहणार आहे. आज आपण देशातील अशा दोन बँकांची माहिती पाहणार आहोत ज्या की आपल्या सीनियर सिटीजन ग्राहकांना फिक्स डिपॉझिट मध्ये पैसे गुंतवण्यासाठी 9.50% दराने परतावा देत आहेत.
या बँका देतात सर्वाधिक व्याज?
फिक्स डिपॉझिट मध्ये केलेली गुंतवणूक ही सुरक्षित असते. फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना राष्ट्रीय बँकांच्या तुलनेत काही स्मॉल फायनान्स बँका अधिकचा परतावा देत आहेत. नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक अशीच एक बँक आहे.
ही बँक आपल्या ग्राहकांना 546 दिवसांपासून ते 1111 दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज ऑफर करते. बँकेच्या माध्यमातून सिनिअर सिटीजन ग्राहकांना या कालावधीच्या एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना तब्बल 9.50% दराने परतावा दिला जातोय.
त्यामुळे जर तुमच्या घरात कोणी सीनियर सिटीजन ग्राहक असेल आणि त्यांच्या नावाने तुम्हाला जर एफडी करायची असेल तर या बँकेचा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे.
याशिवाय युनिटी स्मॉल फायनान्स बँकेच्या माध्यमातून 1001 दिवसांच्या FD वर सर्वाधिक व्याज दिले जात आहे. या कालावधीच्या एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या सीनियर सिटीजन ग्राहकांना बँकेकडून 9.50% दराने परतावा दिला जात आहे.