राज्यातील ‘या’ भागात आभाळ झालं तांबड, ढगाळ हवामानाने चिंता वाढली, राज्यात पुन्हा पाऊस पडणार का? पंजाब डख म्हणतात….

राज्यात कुठेचं अवकाळी पाऊस पडणार नाही, यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये असे पंजाबरावांनी आपल्या या नवीन हवामान अंदाजात स्पष्ट केले आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की राज्यात आता जवळपास पुढील पाच दिवस म्हणजेच 10 जानेवारीपर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे.

Published on -

Panjab Dakh News : महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आज काही ठिकाणी ढगाळ हवामान पाहायला मिळाले. जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात काही भागांमध्ये आभाळ अगदीच तांबडे झालं होतं आणि ढगाळ हवामान तयार झाल. एवढेच नाही तर पावसाचे थेंबही पडू लागले होते. मात्र थोडे फार थेंब पडलेत अन नंतर हे वातावरण निवळल.

पण जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अजूनही ढगाळ हवामान कायम आहे आणि थंडीचा जोर थोडासा कमी झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत असून राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होणार का असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.

दरम्यान महाराष्ट्रात ढगाळ वाहमान तयार झाल्यानंतर लगेचच पंजाबराव डख यांनी एक नवीन अंदाज जारी केला आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे की नाही याबाबत सविस्तर अपडेट दिलेली आहे. पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे आज आणि उद्या महाराष्ट्रात ढगाळ वामन राहणार आहे.

किंबहुना, आज राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळत असून आभाळ भरून आलेले आहे. पण राज्यातील शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे काही कारण नाही कारण की आता राज्यात पाऊस होणार नाही.

राज्यात कुठेचं अवकाळी पाऊस पडणार नाही, यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये असे पंजाबरावांनी आपल्या या नवीन हवामान अंदाजात स्पष्ट केले आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की राज्यात आता जवळपास पुढील पाच दिवस म्हणजेच 10 जानेवारीपर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे.

या काळात राज्यात ढगाळ हवामान पाहायला मिळू शकते मात्र पाऊस पडणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. एवढेच नाही तर राज्यातील बहुतांशी भागांमध्ये 10 जानेवारीपर्यंत कडाक्याची थंडी सुद्धा राहणार आहे.

अकरा आणि बारा तारखेला मात्र राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा ढगाळ हवामान तयार होणार आहे. उत्तर महाराष्ट्रात 11 आणि 12 तारखेला तसेच विदर्भ विभागातील पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये हे दोन दिवस ढगाळ हवामानाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

राज्यात आता पुढील काही दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहील पण जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस होऊ शकतो. यामुळे शेतकऱ्यांनी या हवामान अंदाजानुसार आपल्या शेतीकामांचे नियोजन आखावे असा सल्ला यावेळी तज्ञांनी दिलेला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!