नितीश कुमार शुद्धीवर नाहीत, ते निर्णय घेण्यास अपात्र : तेजस्वी

Published on -

६ जानेवारी २०२५ मोतिहारी : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे शुद्धीवर नाहीत. त्यांना हायजॅक करण्यात आले आहे. सध्या ते प्रचंड थकले आहेत. केवळ निवृत्त अधिकाऱ्यांच्या मदतीने आपल्या फायद्यासाठी ते सरकार चालवत आहेत,असा जोरदार हल्ला राज्याचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी रविवारी चढवला आहे.

नितीश कुमार यांची खालावत जाणारी प्रकृती पाहता त्यांनी मुख्यमंत्री पद सोडावे,असे सांगत मुख्यमंत्री सध्या खोटारडी यात्रा करीत असल्याचा टोला तेजस्वी यादव यांनी लगावला आहे.

आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोतिहारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राजदचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.ते म्हणाले की, नितीश कुमार हे ‘इंडिया’ आघाडीत परत येतील,असा सवाल मीडियावाले विचारत आहेत.

पण,असा प्रश्नच उद्भवत नाही. राजदप्रमुख लालू प्रसाद यादव यांची एक शैली आहे.त्यांनी सहज व मिश्कीलपणे नितीश कुमार यांच्या घरवापसी बाबत भाष्य केले. त्यांना एका जागेवर स्थिर राहू द्यावे,अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली.

जनसुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांच्या आमरण उपोषणावर बोलताना तेजस्वी यादव म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे राजकारण होऊ नये, अशी विद्यार्थ्यांची इच्छा होती. पण, जेव्हा पोलिसांनी लाठीहल्ला केला, तेव्हा प्रशांत किशोर कुठे गेले होते ? असा सवाल तेजस्वींनी उपस्थित केला.

राजदने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत विधानसभेत आवाज बुलंद केला. गेल्या २८ नोव्हेंबर रोजी आमच्या महाआघाडीच्या नेत्यांनी विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर सरकारला जाब विचारला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News