८ जानेवारी २०२५ राहुरी: पुणे स्थित उद्योजक विजयकुमार सेठी यांनी स्व-मालकीचे हेलिकॉप्टर खरेदी केल्यानंतर गावाकडची ओढ असलेल्या सेठी यांनी हेलिकॉप्टर काल मंगळवारी राहुरी फॅक्टरी येथे उतरून मित्र परिवाराच्या उपस्थितीत विधिवत पूजा केली आहे.
काल मंगळवारी पुणे येथील एमवे व्हॅली येथून निघालेले हेलिकॉप्टर ३५ मिनिटात राहुरी फॅक्टरी येथे दाखल होताच इंजीनियरिंग कॉलेजच्या मैदानावर हेलिकॉप्टर लैंड होऊन महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते हेलिकॉप्टरचे पूजन करण्यात आले.
यावेळी विजयकुमार सेठी यांच्यासमवेत त्यांच्या धर्मपत्नी किर्ती सेठी, पुतणे बादल सेठी आदी उपस्थित होते.याप्रसंगी साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे,उद्योजक ऋषभ लोढा, साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगीता कपाळे, चेअरमन सुधाकर कदम, व्हा. चेअरमन आबासाहेब वाळुंज, माजी उपनगराध्यक्ष आण्णासाहेब चोथे, दि राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे, विष्णुपंत गीते, किशोर थोरात, डॉ. विलास पाटील, प्रदिप येवले
प्रशांत काळे, दत्तात्रय दरंदले, दत्तात्रय साळुंके, रामेश्वर तोडमल, माजी नगरसेवक प्रदिप गरड, उद्योजक जयेश मुसमाडे, प्रकाश सोनी, डॉ. संदिप मुसमाडे, नंदकुमार लोढा, वर्धमान लोढा, नितीन डमाळे, रंगनाथ घाडगे, नंदकुमार मोरे, सुनील विश्वासराव, बाळासाहेब सोनवणे, बाळासाहेब पडागळे, हर्षद ताथेड, संदिप गायकवाड, रंगा घाडगे आदींसह मित्रपरिवार व चहातेवर्ग या ठिकाणी उपस्थित होते.
याप्रसंगी राहुरी पोलीस ठाणे, गृहरक्षक दल व देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत अग्निशामक दलाचे जवान भारत साळुंके, सोमनाथ सूर्यवंशी यांनी हेलिपॅड स्थळी मदतकार्य केले.राहुरी फॅक्टरी येथील भूमिपुत्र तथा पुणे स्थित उद्योजक विजयकुमार सेठी यांनी खरेदी केलेल्या स्व-मालकीचे हेलिकॉप्टर राहुरी फॅक्टरीत दाखल होताच मित्रपरिवार व चाहत्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले.