अवकाळी पावसाचा ऍक्शन रिप्ले ! महाराष्ट्रात ‘या’ तारखेपासून पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरवात होणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

सध्या राज्यात काही ठिकाणी किमान तापमानात घसरण सुरु आहे तर काही ठिकाणी किमान तापमानात वाढ दिसून येत आहे. म्हणजेच राज्याचे तापमान सातत्याने बदलत असून तापमानात होणाऱ्या या चढउतारामुळे थंडी देखील कमी जास्त होते. पण, राज्यातील काही भागांमध्ये हवेतील गारठा वाढल्याने थंडीचा कडाका कायम आहे.

Tejas B Shelar
Published:
Maharashtra Rain

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा बिघाड होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यातील काही भागांमध्ये उद्यापासून पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज दिला आहे. हवामान खात्यातील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या 10 जानेवारी 2025 रोजी आणि 11 जानेवारी 2025 रोजी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

या अनुषंगाने सदरील जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील हवामान गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदलत आहे. डिसेंबर महिन्यात लोकांनी हवामानाच्या या लहरीपणाचा चांगला अनुभव घेतला.

सध्या राज्यात काही ठिकाणी किमान तापमानात घसरण सुरु आहे तर काही ठिकाणी किमान तापमानात वाढ दिसून येत आहे. म्हणजेच राज्याचे तापमान सातत्याने बदलत असून तापमानात होणाऱ्या या चढउतारामुळे थंडी देखील कमी जास्त होते. पण, राज्यातील काही भागांमध्ये हवेतील गारठा वाढल्याने थंडीचा कडाका कायम आहे.

अशातच आता भारतीय हवामान खात्याने येत्या काही दिवसांनी राज्यात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज दिला आहे. एकीकडे राज्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे राज्यात अवकाळी पावसाची सुद्धा शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

आय एम डी मधील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या अवकाळी पावसानंतर राज्यातील खानदेशसहित संपूर्ण महाराष्ट्रातील किमान तापमानात घसरण झाली असून थंडीचा कडाका वाढला आहे.

प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रात गारठ्याचे प्रमाण हे अधिक आहे. महत्वाची बाब म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांसहित राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये येत्या दोन दिवसात राज्यात थंडीचा जोर पुन्हा वाढणार असून तापमानात तीन ते चार अंशांनी घसरण होण्याचा अंदाज आहे.

मात्र, त्यानंतर तापमानात पुन्हा एकदा दोन ते चार अंशांनी वाढ होणार आहे. याच कारणांमुळे 10 आणि 11 जानेवारीला विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे.

अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय झाल्याने राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होणार असल्याचे हवामान खात्याने या आपल्या नव्या बुलेटीनमध्ये स्पष्ट केले आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, १० जानेवारी व ११ जानेवारीला विदर्भातील 11 जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या संबंधित जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची आणि पशुधनाची योग्य ती काळजी घ्यावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe