काय सुरू आहे… मोदींच्या चौकशीने भामाबाई अचंबित ! पंतप्रधानांनी सभापती प्रा. शिंदेंच्या कुटुंबाशी साधला मराठीत संवाद ; अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीचे दिले निमंत्रण

Sushant Kulkarni
Published:

१० जानेवारी २०२५ जामखेड: देशाच्या पंतप्रधानांना प्रत्यक्ष पाहण्याची त्यांची पहिलीच वेळ… अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना मराठीत विचारले… काय सुरू आहे… आपल्याशी ते बोलत असल्याचे जाणवल्याने खूष झालेल्या भामाबाई शिंदे यांनी… चांगले चालले आहे… असे त्यांना सांगितले.या संवादाने शिदे परिवाराच्या चेहऱ्यावर हास्य पसरले… निमित्त होते महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या परिवाराशी पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतील स्वतःच्या निवासस्थानी साधलेल्या संवादाचे.भामाबाई शिंदे या सभापती प्रा. शिंदे यांच्या आई आहेत.

यावेळी प्रा. शिंदे यांनी चौंडी (जामखेड) येथे येत्या ३१ मे २०२५ रोजी होणाऱ्या पुण्यश्रोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवास येण्याचे निमंत्रण पंतप्रधान मोदी यांना दिले.त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही प्रा. शिंदे यांनी सांगितले.

सभापती प्रा. राम शिंदे यांचे कुटुंब पहिल्यांदाच दिल्लीत आले होते.अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कुटुंबाला भेटणे आणि आई भामाबाईशी मराठीतून संवाद साधणे आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे.काय सुरु आहे… असे मोदी यांनी आईला मराठीतून विचारले.

पंतप्रधानांनी २०-२५ मिनिटे कुटुंबियांशी चर्चा केली, असे प्रा. शिंदे यांनी सांगितले.आई भामाबाई शिंदे, पत्नी आशाबाई शिंदे, जावई श्रीकांत खांडेकर, मुलगी अक्षदा खांडेकर-शिंदे, यांच्यासह अन्विता शिदे, अजिंक्य शिदे, भाऊ सौरभ शिंदे या कुटुंब सदस्यांसह प्रा. शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कुटुंबातील प्रत्येक सदस्याशी संवाद साधला.यावेळी पुण्यश्रोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती देऊन त्यांचा प्रा. शिंदे यांनी सन्मान केला विधानपरिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल त्यांनी माझे अभिनंदन करून मला मोलाचे मार्गदर्शन केले.तर, माझ्यावर विश्वास ठेवून मला सभापतीपदाची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त केले.यावेळी त्यांनी कुटुंबाची देखील आपुलकीने चौकशी केली, असे प्रा. शिंदे यांनी सांगितले.

निमंत्रण स्वीकारले

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती (त्रिशताब्दी जयंती महोत्सव) चौंडी (ता. जामखेड,जि.अहिल्यानगर) येथे ३१ मे २०२५ रोजी उत्साहात साजरी होणार आहे.या जयंती सोहळ्यास उपस्थित राहावे असे निमंत्रण यावेळी पंतप्रधान मोदी यांना दिले व त्यांनी ते स्वीकारले,असेही सभापती प्रा. शिंदे यांनी सांगितले व वा अविस्मरणीय भेटीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक आभार मानले.

दरम्यान, या दिल्लीभेटी दरम्यान, प्रा. शिंदे यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड़, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि महासचिव विनोद तावडे यांचीही भेट घेऊन त्यांना त्रिशताब्दी जयंती महोत्सवाचे निमंत्रण दिले. यापूर्वी चौंडीत राष्ट्रपती आले होते. आता पंतप्रधानही येतील, अशी आशा असल्याचे सभापती प्रा. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe