वजन कमी करण्यासाठी एक महिना वापरून तर पहा 6-6-6 चा चालण्याचा नियम! जाणून घ्या माहिती

आजकाल वाढत्या वजनाची समस्या ही बऱ्याच जणांना असल्याचे दिसून येत असून वजन कमी करण्यासाठी नाना तऱ्हेचे उपाय करताना आपल्याला अनेक जण दिसून येतात. परंतु तरीदेखील अपेक्षित असा परिणाम बऱ्याच जणांना दिसून येत नाही. परंतु यामध्ये जर आपण बघितले तर वजन कमी करण्यासाठी वॉकिंग हा देखील एक उत्तम मार्ग आहे

Ajay Patil
Published:
weight loss tips

6-6-6 Walking Rule:- आजकाल वाढत्या वजनाची समस्या ही बऱ्याच जणांना असल्याचे दिसून येत असून वजन कमी करण्यासाठी नाना तऱ्हेचे उपाय करताना आपल्याला अनेक जण दिसून येतात. परंतु तरीदेखील अपेक्षित असा परिणाम बऱ्याच जणांना दिसून येत नाही. परंतु यामध्ये जर आपण बघितले तर वजन कमी करण्यासाठी वॉकिंग हा देखील एक उत्तम मार्ग आहे व फक्त वॉकिंग म्हणजे चालल्याने देखील वजन कमी करता येऊ शकते असे म्हटले जाते.

परंतु चालण्याच्या बाबतीत काही नियम किंवा काही सूत्र पाळणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे या लेखामध्ये आपण चालण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला 6-6-6 चा नियम कसा फायद्याचा आहे व हा नियम नेमका काय आहे? याबाबतची माहिती थोडक्यात बघू.

6-6-6 चालण्याचा नियम नेमका काय आहे?
6-6-6 चालण्याचा नियम हा एक साधा नियम असून यामध्ये तुम्हाला दिवसातून एकदा साठ मिनिटे चालावे लागते. हे 60 मिनिटे तुम्ही सकाळी सहा वाजता किंवा संध्याकाळी सहा वाजता चालू शकतात आणि याशिवाय तुम्हाला सहा मिनिटे वार्मअप आणि सहा मिनिटे एकदम शांत म्हणजेच कुल डाऊन देखील करणे गरजेचे राहील.

हा नियम जर पाहिला तर अशा पद्धतीने चालल्याने कॅलरी बर्न होतात व नियमितपणे साठ मिनिटे चालल्याने भरपूर कॅलरीज बर्न होऊ शकतात. तसेच हा नियम तुमची मेटाबोलिझम म्हणजे चयापचय देखील वाढवतो व त्यामुळे शरीर जास्त कॅलरीज बर्न करते. तसेच नियमित चालल्यामुळे शरीरात जमा झालेली चरबी आणि खास करून पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते.

तसेच हा नियम पाळून जर चालला तर हृदयाचे आरोग्य देखील सुधारण्यास मदत होते व तणाव देखील कमी होतो व व्यक्ती मानसिक दृष्टीने निरोगी होते. हा नियम पाळण्यामुळे वजन तर कमी होतेच परंतु नियमित चालल्यामुळे तुमचे शरीर मजबूत आणि तंदुरुस्त होते.

अशा पद्धतीने चालण्याने मधुमेह तसेच हाय ब्लड प्रेशर आणि हृदय विकार यासारख्या अनेक आजारांचा धोका कमी होतो. तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक उत्साही आणि सक्रिय वाटायला लागते व नियमितपणे चालल्याने चांगली झोप देखील येण्यास मदत होते.

हा नियम कोणाला पाळता येऊ शकतो?
प्रत्येकाला हा नियम तसे पाळणे सोपे आहे. तुमचे वय किंवा तुमची फिटनेस पातळी कशी आहे याचा काही फरक यामध्ये पडत नाही. तुम्हाला फक्त एक आरामदायक जागा आणि थोडा वेळ स्वतःसाठी काढण्याची यामध्ये आवश्यक आहे.

परंतु तुम्हाला जर हाय ब्लडप्रेशर किंवा हृदय विकार असेल तर मात्र प्रथम डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला काही आरोग्य समस्या असतील तर डॉक्टरचा सल्ला घेतल्यानंतरचा हा नियम फॉलो करावा.

तसे या आधी जर तुम्ही व्यायाम केलाच नसेल तर हळूहळू सुरुवात करावी आणि हळूहळू चालण्याची वेळ आणि अंतर वाढवावे.तसेच चालण्यासाठी कम्फर्टेबल असे शूज घालावेत. तसेच चालताना पाणी पिणे देखील तितकेच गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe