४ मुले जन्माला घाला, २ लाख रुपये बक्षीस देतो ! मध्य प्रदेश सरकारच्या परशुराम कल्याण मंडळाच्या अध्यक्षांची अजब घोषणा

Mahesh Waghmare
Published:

१४ जानेवारी २०२५ इंदौर : मध्य प्रदेश सरकारच्या परशुराम कल्याण मंडळाचे अध्यक्ष पंडित विष्णू राजोरिया यांनी ब्राह्मण समुदायाला चार मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे.चार मुले जन्माला घालणाऱ्या दाम्पत्याला १ लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा देखील त्यांनी केली. मात्र यावरून वाद निर्माण होताच ही सरकारी योजना नसून आपण वैयक्तिकरीत्या बक्षीस देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

इंदौरमध्ये सनाढ्य ब्राह्मण समुदायातील विवाह इच्छुक युवक-युवतींचा रविवारी परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता.परशुराम मंडळाच्या अध्यक्षांचा या मेळाव्यातील भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.यामध्ये राजोरिया ब्राह्मण समुदायाच्या वाढीसाठी अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन करताना दिसतात.

चांगले पद-प्रतिष्ठा मिळवल्यानंतर ब्राह्मण दाम्पत्य केवळ एक मूल जन्माला घालून कुटुंब मर्यादित ठेवतात.मात्र हे योग्य नाही.विवाह इच्छुक युवक-युवतींना माझे आवाहन आहे की, तुम्ही किमान चार मुले जन्माला घातली पाहिजे.समाजातील जे दाम्पत्य चार मुले जन्माला घालतील त्यांना परशुराम कल्याण मंडळ एक लाख रुपये देईल मी भविष्यात या मंडळाचा अध्यक्ष नसलो तरी या पदावर येणारा दुसरा व्यक्ती हे बक्षीस देईल,अशी घोषणा राजोरिया यांनी केली.

मात्र त्यांच्या या घोषणेवरून वाद निर्माण झाला आहे. लोकसंख्यावाढीसाठी सरकारने योजना आणली आहे का, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. यावर राजोरिया यांनी सारवासारव करत १ लाख रुपयांचे बक्षीस आपण वैयक्तिकरीत्या देणार असल्याचे स्पष्ट केले. देशात काही समुदायाची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. त्याचवेळी ब्राह्मणांची लोकसंख्या १९५१च्या तुलनेत अर्धी झाली आहे, असा दावा राजोरिया यांनी केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe