शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरू करा ! मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश, पर्यटन व धार्मिक स्थळांना जोडणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे सूचित

Published on -

१४ जानेवारी २०२५ मुंबई : राज्यातील दळणवळण सुविधा तसेच व्यावसायिक संधी त्याचसोबत पर्यटनाला व्यापक प्रमाणात गती देणाऱ्या शासनाच्या महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्गाच्या कामाचे नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेने सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आगामी शंभर दिवसांत सार्वजनिक बांधकाम विभागाने करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला.त्यावेळी त्यांनी संबंधितांना निर्देशित केले.बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, सचिव सदाशिव साळुंखे, सचिव ए. दशपुते, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व्यवस्थापक अनिल गायकवाड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील महामार्गाची उभारणी तसेच रस्त्यांचे जाळे दर्जेदार आणि अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने नियोजन करण्याचे सूचित करून सांगितले की, राज्यातील धार्मिक स्थळांना जोडणारा आणि पर्यटन उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाची उभारणी ही दर्जेदार आणि गतिमानतेने करावयाची असून त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

समृद्धी महामार्गाचे उर्वरित अंतिम टप्प्याचे आणेपर्यंतचे ७६ किमी लांबीचे काम तत्परतेने पूर्ण करून फेब्रुवारी पर्यंत हा महामार्ग पूर्णपणे खुला करावा.तसेच यावर्षी समृद्धी महामार्गाचे कर्जरोखे प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी.प्रवाशांना उपयुक्त ठरणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील १३.३० किमी मिसिंग लिंकचे कामही गतीने पूर्णत्वास न्यावे.त्याचप्रमाणे नाशिक-मुंबई या महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गाचे सुधारणा करण्याचे कामही तातडीने पूर्ण करावे.तसेच मंत्रालय परिसरात नवीन सात मजली इमारतीच्या उभारणी कामाची सुरुवात येत्या शंभर दिवसांत करण्याचे सूचित केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News