तुम्हाला श्रीमंत करू शकतो ‘हा’ पेनी स्टॉक! बाजारातील घसरणीमध्ये देखील नोंदवली मजबूत तेजी

शेअर बाजारामध्ये गेल्या काही दिवसांपासून काहीशी घसरणीची स्थिती दिसून येत आहे. जर आपण काल म्हणजे समोरचा विचार केला तर शेअर बाजारामध्ये बीएससी सेन्सेक्स 1000 पेक्षा जास्त अंकांनी घसरला तर एनएसई निफ्टी 345 पेक्षा जास्त अंकांनी घसरल्याचे स्थिती होती. या सगळ्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितले तर अनेक महत्त्वाच्या कंपन्यांचे शेअर्स घसरले. परंतु बाजाराच्या या स्थितीत देखील एक पेनी शेअर्स असा राहिला की त्यामध्ये तेजी दिसून आली.

Published on -

Penny Stock:- सध्या शेअर बाजारामध्ये गेल्या काही दिवसांपासून काहीशी घसरणीची स्थिती दिसून येत आहे. जर आपण काल म्हणजे समोरचा विचार केला तर शेअर बाजारामध्ये बीएससी सेन्सेक्स 1000 पेक्षा जास्त अंकांनी घसरला तर एनएसई निफ्टी 345 पेक्षा जास्त अंकांनी घसरल्याचे स्थिती होती.

या सगळ्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितले तर अनेक महत्त्वाच्या कंपन्यांचे शेअर्स घसरले. परंतु बाजाराच्या या स्थितीत देखील एक पेनी शेअर्स असा राहिला की त्यामध्ये तेजी दिसून आली.

चक्क या शेअर्समध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसले. हा पेनी स्टॉक होता अन्नवृद्धी वेंचर्स लिमिटेड या कंपनीचा. या कंपनीचे शेअर्स काल 20 टक्क्यांनी वाढले व 25.61 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचले होते. जर मागील बंद किंमत जर बघितली तर ती 21.39 रुपये होती.

सोमवारी अन्नवृद्धी वेंचर्स लिमिटेडचे शेअर्सची कामगिरी कशी राहिली?
सोमवारचे ट्रेडिंग सत्र बघितले तर यामध्ये या कंपनीचे शेअर्स मागील बंद झालेल्या 21.39 रुपयांच्या तुलनेमध्ये तब्बल 19.73 टक्क्यांनी वाढले व या वाढीसह ते 21.90 रुपयांवर उघडले होते

व मार्केटच्या संपूर्ण व्यवहाराच्या दरम्यान हा शेअर 25.61 रुपयांवर पोहोचला.तसेच स्टॉकचा जर 52 आठवड्याचा उच्चांक बघितला तर तो 39.90 आणि निचांक 21.01 आहे.

अन्नवृद्धी वेंचर्स लिमिटेड कंपनी काय काम करते?
जर आपण अन्न वृद्धी वेंचर्स लिमिटेड कंपनीचे काम बघितले तर ही कंपनी भारतामध्ये कृषी कमोडिटी व्यवसायामध्ये सक्रिय असून डाळी, मसाले आणि ग्राहक उपयोगी अन्न उत्पादनांसारखे व्यावसायिक उत्पादनांवर या कंपनीचा फोकस आहे.

अन्न वृद्धी वेंचर्सच्या तिमाही निकाल जर बघितले तर त्यानुसार या कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसुलात वार्षिक आधारावर तब्बल 12,933.33 टक्क्यांची वाढ झाली आहे.

2025 च्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तीमाहित ते 19.55 कोटी रुपये आले व आर्थिक वर्ष 24 च्या तिसऱ्या तीमाहित 0.15 कोटी रुपये होते. त्यामध्ये आता 16.93 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत महसूल 16.72 कोटी रुपये होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!