हवामानात मोठा बदल, आज आणि उद्या महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता !

आज आणि उद्या म्हणजेच मंगळवारी (१४ जानेवारी आणि बुधवारी (१५ जानेवारी) विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, हिमालयात बुधवारपासून (१५ जानेवारी) पश्चिमी विक्षोप (थंड वाऱ्याचा झंझावात) सक्रीय होण्याचा अंदाज आहे.

Tejas B Shelar
Published:
Havaman Andaj 2025

Havaman Andaj 2025 : डिसेंबर महिन्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता आणि त्यामुळे राज्यात काही ठिकाणी पाऊस झाला. गेल्या महिन्यात देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला होता आणि याचाच प्रभाव आपल्या महाराष्ट्रावर देखील पाहायला मिळाला.

दरम्यान जानेवारी 2025 मध्ये ही अशीच परिस्थिती तयार होणार असे दिसते. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे.

विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात दोन दिवस ढगाळ हवामान राहण्याचा आणि तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यातील तज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. आणि याचाच प्रभाव म्हणून महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. हवामान खात्यातील तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, बंगालच्या उपसागरावरून महाराष्ट्रात बाष्पयुक्त वारे दाखल होत आहेत.

हे बाष्पयुक्त वारे प्रामुख्याने दक्षिण विदर्भ, दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात येत आहेत. दरम्यान याच बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे या भागांमध्ये पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली असून या ठिकाणी आत्तापासून ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे.

ढगाळ हवामान आणि पावसाळी वातावरणामुळे या भागातील थंडीही कमी झाली आहे. साधारण पुढील चार दिवस या भागात ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच पुढील चार दिवस या भागात थंडीचे प्रमाण कमीच राहील.

आज आणि उद्या म्हणजेच मंगळवारी (१४ जानेवारी आणि बुधवारी (१५ जानेवारी) विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, हिमालयात बुधवारपासून (१५ जानेवारी) पश्चिमी विक्षोप (थंड वाऱ्याचा झंझावात) सक्रीय होण्याचा अंदाज आहे.

त्याचा परिणाम म्हणून उत्तर भारतात पुन्हा थंडीत वाढ होण्याचा अंदाज आहे. थंड वाऱ्याचा जोर जास्त राहिल्यास उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भात किमान पारा खाली जाण्याचा अंदाज आहे. म्हणजेच या भागात थंडीचा जोर आणखी वाढणार आहे.

राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे आणि यामुळे मात्र शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागलाय. खरे तर गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते आणि आता पुन्हा एकदा तशीच परिस्थिती तयार होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe