Women Government Scheme : मित्रांनो, केंद्र आणि राज्य शासन महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने प्रयत्न करतय, शासनाच्या प्रयत्नांमुळे नक्कीच गेल्या काही वर्षांमध्ये महिलांचा समाजातील मान-सन्मान वाढलाय अन आता कोणत्याच क्षेत्रात महिला मागे राहिलेल्या नाहीत. महिलांना सर्व ठिकाणी प्राधान्य मिळतय, पण आजही पुरुषांच्या तुलनेत काही क्षेत्रात महिला पिछाडीवर आहेत. यामुळे शासनाकडून महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाने गेल्या वर्षी जुलै महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहीर केली. ही योजना गेल्या वर्षी सुरु झाली अन अगदीच कमी कालावधीत सर्वाधिक लाभार्थी संख्या असणारी योजना बनली. या अंतर्गत महिलांना दरमहा आर्थिक लाभ दिला जातोय.
राज्यातील लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ सरकारकडून मिळतोय आणि यामुळे महिला वर्गाला मोठा आर्थिक दिलासा मिळतं आहे. या पैशांमुळे महिलांना संसारातील बारीक-सारीक गरजा भागवता येतात म्हणून महिला खूपच समाधानी आहेत. दरम्यान आता महिलांसाठी एलआयसीने देखील एक विशेष योजना सुरू केली असून या अंतर्गत देखील महिलांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
एलआयसीने सुरू केलेल्या या नव्या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा सात हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण एलआयसीने सुरु केलेल्या या नव्या योजनेचे नाव, नव्या योजनेचे स्वरूप, त्याचे फायदे अन किती महिलांनी यासाठी अर्ज केलेत ? याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
मंडळी, एलआयसीने जी नवीन योजना सुरू केली आहे त्या योजनेला विमा सखी योजना असे नाव देण्यात आले आहे. ही योजना डिसेंबर 2024 पासून सुरू झाली असून या अंतर्गत महिलांना एलआयसी कडून स्पेशल ट्रेनिंग दिली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ट्रेनिंग पिरेडमध्ये महिलांना मानधन सुद्धा मिळणार आहे.
या अंतर्गत महिलांना दरमहा सात हजार रुपये दिले जाणार आहेत. विमा सखी योजनेतून दिली जाणारी ट्रेनिंग महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी दिली जाणार आहे. या योजनेतून महिलांना एलआयसी एजंट बनवले जाईल. योजनेत सहभाग नोंदवल्यानंतर महिलांना पहिल्या वर्षी सात हजार रुपये प्रति महिना असा आर्थिक लाभ दिला जाणार आहे.
दुसऱ्या वर्षी महिलांना सहा हजार रुपये प्रति महिना असा आर्थिक लाभ मिळणार आहे अन तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये प्रति महिना असा आर्थिक लाभ मिळणार आहे. ज्या महिला चांगली ट्रेनिंग घेऊन चांगला परफॉर्मन्स दाखवतील त्यांना एलआयसी कडून कमिशन सुद्धा मिळणार आहे. एलआयसीकडून ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर महिला एलआयसी एजंट बनतील आणि त्यानंतर त्यांना एक शाश्वत रोजगार उपलब्ध होणार आहे.
यामुळे एलआयसीच्या या योजनेचे अनेकांकडून कौतुक करण्यात आले आहे, स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या योजनेचे कौतुक केले अन एलआयसीच्या या कामगिरीचे स्वागत केले. विशेष म्हणजे महिलांकडून या योजनेला जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. या योजनेसाठी किमान दहावी पास महिला पात्र ठरत असून आत्तापर्यंत 50 हजाराहून अधिक महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेत.
जर तुम्हालाही या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुमचे वय 18 ते 70 वर्ष यादरम्यान असणे अन तुम्ही किमान दहावी पास असणे आवश्यक आहे. अठरा वर्षांपेक्षा कमी आणि 70 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. बाकी सर्व भारतीय महिलांना याचा लाभ घेता येईल. नक्कीच एलआयसीची ही योजना महिलांना स्पेशल ट्रेनिंग देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मोठी फायदेशीर ठरणार आहे आणि यामुळे महिलांचा विकास होणार आहे.