भारताबद्दल मार्क भाऊ ‘हे’ काय बोलले ? ‘त्या’ विधानामुळे झुकरबर्गला बसणार दणका !

Mahesh Waghmare
Published:

१५ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : भारतातल्या निवडणुकांबद्दल वादग्रस्त विधान करणे फेसबुकचे संस्थापक आणि मेटा कंपनीचे हेड असलेलया मार्क झुकरबर्गला महागात पडणार असे दिसत आहे. संसदेच्या स्थायी समितीकडून यासंदर्भात भारताची प्रतिमा डागाळल्या प्रकरणी झुकरबर्गला नोटीस बजावली जाण्याचे दिसत आहे.

कोरोना महामारीनंतर २०२४ साली झालेल्या निवडणुकांमध्ये भारताबरोबरच बाकीच्या देशांतील विद्यमान सरकार पडल्याचा दावा झुकरबर्ग यांनी नुकताच केला होता म्हणून त्यावर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देखील तीव्र आक्षेप घेत झुकरबर्ग चुकीची माहिती पसरवत असल्याचे म्हटले होते.

भाजपचे खासदार आणि संसदेच्या दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे यांनी या प्रकरणात मार्क झुकरबर्गला नोटीस पाठवण्याचा इशारा दिला आहे.आपली समिती,चुकीची माहिती पसरवल्याबद्दल मेटाच्या अधिकाऱ्यांना नोटीस पाठवणार आहे.कोणत्याही लोकशाही देशासंदर्भातील चुकीच्या माहितीमुळे संबंधित देशाची प्रतिमा मलिन होते असे त्यांनी म्हटले.

अश्या पद्धतीच्या या चुकीच्या वक्तव्याबद्दल मेटा कंपनीने संसदेची आणि भारतीय लोकांची लगेच माफी मागावी,असे दुबे यांनी सोशल माध्यमातून म्हटले आहे. झुकरबर्ग यांचे वक्तव्य हे चिंताजनक आणि भारतीय लोकशाहीत हस्तक्षेप करणारे आहे.

कोरोनानंतर देशात सरकारविरोधात वातावरण असल्यासंबंधी झुकरबर्ग यांनी केलेले वक्तव्य पूर्णपणे चुकीचे आहे.स्वातंत्र्यानंतर देशात दुसरी वेळ अशी आहे की, ज्यावेळी एकच आघाडी सलग तिसऱ्यांदा विजयी झाली आहे.

मागच्यावेळी आमच्याजवळ ३०३ जागा होत्या आणि आत्ता सुद्धा आमच्याजवळ ३०० च्या जवळपास जागा आहेत.त्यामुळे झुकरबर्ग यांनी केलेले वक्तव्य चिंता करण्यासारखे आहे.कारण जगभरात सोशल मीडियामुळे वातावरण तयार करत असल्याचे दुबे म्हणाले.

सोशल मीडियावरून महिला व मुलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले जात असल्याचे नमूद करत दुबे यांनी ऑस्ट्रेलियाने देखील १८ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध घातल्याकडे लक्ष वेधले.त्यामुळे झुकरबर्ग यांनीं केलेल्या चुकीच्या वक्तव्याबद्दल आपली समिती २० ते २४ जानेवारी दरम्यान त्यांच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन जाब विचारणार आहेत असे दुबे यांनी सांगितले आहे.

उल्लेखनीय गोष्ट हि आहे कि झुकरबर्ग यांनी अमेरिकेतील एका पॉडकास्टमध्ये बोलताना भारतीय निवडणुकीवर भाष्य केले होते.२०२४ हे वर्ष पूर्ण जगासाठी एक मोठे निवडणूक वर्ष होते.भारतासोबतच बाकीच्या देशांत झालेल्या निवडणुकीत विद्यमान सत्ताधाऱ्यांना पराभव पहावा लागला होता.

यासाठी कोरोना महामारी,आर्थिक धोरण व महागाईसारखे घटक कारणीभूत होते,असे वक्तव्य झुकरबर्ग यांनी केले होते.केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारीच झुकरबर्ग यांना प्रत्युत्तर देत ते चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप लावला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe