१५ जानेवारी २०२५ पारनेर : राज्यात सर्वसामान्य जनतेने महायुतीला कौल दिला असून सर्वप्रथम सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तातडीने सोडवा,जर आपले काम प्रामाणिकपणे करायचे नसेल तर अन्यत्र बदली करून घ्या, असा इशारा राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे यांनी देतानाच दोषींवर कारवाई करणार असल्याचे सांगितले.
पारनेर येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात मंत्री राधाकृष्ण विखे व पारनेरचे आमदार काशिनाथ दाते व महायुतीच्या पदाधिकारी, तालुक्यातील सरपंच व सर्व शासकीय खात्याच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी अनेक गावातील सरपंच व ग्रामस्थांनी जलजीवन योजनेचे काम फक्त २० टक्के असताना या योजनेचे बिल मात्र ६० ते ७० टक्के काढले असून झालेले कामही निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रारी केल्या.महावितरण वीज कंपनीच्या गलथान कारभाराचा पाढा हि वाचला.तसेच सुपा औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीमुळे कंपनी चालक, कामगार व इतर व्यावसायिक त्रस्त झाले असून पोलीस मात्र बघ्याची भूमिका पार पडत असल्याचे विखे यांना निदर्शनास आणून दिले.
यावेळी आ. दाते, भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, मा. जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे, राष्टवादीचे तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य विशवनाथ कोरडे, भाजप महिला आघाडीच्या सोनाली सालके व सुनील थोरात आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी सामन्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत न करता टाळाटाळ करीत असल्याचे मंत्री विखे यांच्या निदर्शनास आणून दिले.
सर्व नागरिकांचे प्रश्न एकूण घेतल्यानंतर तक्रार असलेल्या प्रशाकीय अधिकाऱ्यांना विखे यांनी जाब विचारात येत्या आठ दिवसात प्रश्न सोडवण्यासाठी हालचाली करण्याचा सूचना देत तालुक्यात काही अधिकाऱ्यांच्या नेमणुका कोणाच्या सूचनेने झाल्या असतील आणि ते काम करत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
चांगले काम करा.आम्ही तुमचे कौतुक करू असे सांगत कामचुकारांवर कारवाई करणार असल्याचा सज्जड इशारा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.तालुक्यातील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
या वेळी आ. काशिनाथ दाते, भाजप प्रदेश कार्यकारी सदस्य विश्वनाथ कोरडे, सुजित झावरे, प्रांताधिकारी श्रीकुमार चिचंकर, तहसीलदार गायत्री सौंदाणे, प्रभारी गटविकास अधिकारी दयानंद पवार, जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, भाजप तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर, डॉ. भाऊ साहेब खिलारी, गणेश शेळके, सुनील थोरात, सचिन शेळके, मनोज मुंगसे, वसंत चेडे, सुरेश पठारे, दादा पाठारे, लाभेश औटी, सोनाली सालके, सुषमा रावडे उपस्थित होते.
मंत्री विखे म्हणाले की, कार्यकर्त्यांनी तक्रार करण्यापेक्षा ही कामे कशी होतील त्याचा पाठपुरावा करावा.सर्वसामान्य जनतेची अडवणूक जिथे होते तिथे आवाज उठवा.जनतेच्या मनातील महायुती सरकार राज्यामध्ये आले आहे.दोन ते तीन महिन्यांत ही घड़ी व्यवस्थित बसेल,तालुक्याची दुष्काळी ओळख पुसून काढणार असून, त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.कायदा सुव्यवस्थेला कुठे गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या,तालुका भयमुक्त करणार असून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका राहणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
त्या सहाय्यक निबंधकावर कारवाई करा
पारनेर तालुक्यातून सहकार संपण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तत्कालीन सहायक निबंधक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी सेवा सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केली.सादर निबंधकाच्या तालुक्यातून मोठी माया गोळा केली असून सेवा संस्थेच्या निवडणुकांमध्ये कुना एकाच गटाला मदत केली.तसेच सद्या नगर येथे बदली होऊनही काही पतसंस्थांना अजूनही त्रास देत असल्याची तक्रार केली आहे.यावर मंत्री विखे यांनी माहिती घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन संबंधितांना दिले आहे