Mutual Fund मध्ये अशा तऱ्हेने गुंतवणूक केली तर 1000 रुपयांची गुंतवणूक करूनही करोडपती होता येणार ! कस ते पहा ?

FD व इतर बचत योजनांमधून मिळणारे रिटर्न हे शेअर मार्केट आणि म्युचुअल फंड मधून मिळणाऱ्या रिटर्नच्या तुलनेत कमीच दिसतात. म्हणूनचं अलीकडे चांगले रिटर्न मिळवण्यासाठी काही गुंतवणूकदार म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करताना दिसत आहेत. Mutual Fund मध्ये SIP करून अनेकजण करोडपती झाले आहेत.

Tejas B Shelar
Published:
Mutual Fund Investment Tips

Mutual Fund Investment Tips : मित्रांनो, आपण सर्वजण आपल भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हावे यासाठी आपल्याकडील पैसे विविध ठिकाणी गुंतवत असतो. काहीजण सुरक्षित गुंतवणुकीला पसंती दाखवून बँकेची एफडी योजना, पोस्ट ऑफिस च्या बचत योजना तसेच एलआयसीच्या अन सरकारी बचत योजनांमध्ये गुंतवणूक करतात. पण, अशा सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना एक मर्यादेत परतावा मिळतो.

FD व इतर बचत योजनांमधून मिळणारे रिटर्न हे शेअर मार्केट आणि म्युचुअल फंड मधून मिळणाऱ्या रिटर्नच्या तुलनेत कमीच दिसतात. म्हणूनचं अलीकडे चांगले रिटर्न मिळवण्यासाठी काही गुंतवणूकदार म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करताना दिसत आहेत. Mutual Fund मध्ये SIP करून अनेकजण करोडपती झाले आहेत. म्हणून आज आपण म्युच्युअल फंड मध्ये 1 हजार, 2 हजार, 3 हजार अन 5 हजार रुपयांची SIP केल्यास किती रिटर्न मिळणार ? याची माहिती जाणून घेणार आहोत.

मंडळी म्युच्युअल फंड मध्ये दोन पद्धतीने गुंतवणूक केली जाते. एक म्हणजे SIP करून अन दुसरे म्हणजे Lumpsum कक्क amnगुंतवणूक करून. SIP मध्ये दरमहा एक ठराविक रक्कम गुंतवली जाते तर Lump Sum गुंतवणुकीत एकाचवेळी ठराविक रक्कम गुंतवली जाते. पण आज आपण म्युच्युअल फंडमधील एस आय पी बाबत माहिती पाहणार आहोत.

म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूकदार दरमहा त्यांना हवी तेवढी रक्कम गुंतवून एक मोठा फंड तयार करू शकतात. महत्त्वाचे म्हणजे गुंतवणुकीच्या रकमेत दरवर्षी वाढ केली तर त्यांना अधिकचा फायदा होऊ शकतो. एस आय पी च्या रकमेत दरवर्षी वाढ केल्यास अशा SIP ला स्टेप अप SIP म्हणून ओळखलं जातं. यात किमान एक हजार रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरुवात करूनही गुंतवणूकदार एक कोटी रुपये कमवू शकतो.

मंडळी एसआयपीवर गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 12 टक्के दराने परतावा मिळतोय. काही म्युच्युअल फंड याहीपेक्षा अधिकचा परतावा देत असल्याचा दावा होतो. पण म्युच्युअल फंडमधून सरासरी वार्षिक 12 टक्के दराने परतावा मिळतो. आता आपण एक हजार, दोन हजार, तीन हजार आणि पाच हजार रुपयांची गुंतवणूक करून कशा तऱ्हेने करोडपती होता येईल याबाबत माहिती पाहूयात.

1000 रुपयांची SIP किती वर्षांनी बनवणार करोडपती – मंडळी, जर एखाद्या गुंतवणूकदाराने SIP मध्ये किमान एक हजार रुपयांच्या गुंतवणुकीपासून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आणि ही रक्कम दरवर्षी दहा टक्क्यांनी वाढवली म्हणजेच स्टेप अप एसआयपी केली तर वार्षिक 12 टक्के व्याज दराने 31 वर्षांनी 10178027 रुपये रिटर्न मिळणार आहेत. यामध्ये 21 लाख 83 हजार 321 रुपये गुंतवणूकदारांची इन्व्हेस्टमेंट राहणार आहे आणि उर्वरित 79 लाख 94 हजार 706 रुपये रिटर्न मिळणार आहेत.

2000 रुपयांची स्टेप अप SIP किती वर्षांनी बनवणार करोडपती : जर एखाद्या गुंतवणूकदाराने दरमहा दोन हजार रुपयांची गुंतवणूक सुरू केली आणि दरवर्षी गुंतवणुकीची रक्कम दहा टक्क्यांनी वाढवली तर 27 वर्षांनी वार्षिक 12 टक्के दराने एक कोटी 14 लाख 75 हजार 719 रुपये मिळणार आहेत. यामध्ये 29 लाख 6 हजार 399 रुपये गुंतवणूकदाराची इन्व्हेस्टमेंट राहणार आहे आणि उर्वरित 85 लाख 69 हजार 321 रुपये रिटर्न मिळणार आहेत.

तीन हजार रुपयांची स्टेप अप एसआयपी किती वर्षांनी बनवणार करोडपती – जर एखाद्या गुंतवणूकदाराने दरमहा तीन हजार रुपयांची गुंतवणूक सुरू केली आणि दरवर्षी गुंतवणुकीची रक्कम 10 टक्क्यांनी वाढवली तर 12 टक्के दराने 24 वर्षात एक कोटी दहा लाख 47 हजार 86 रुपये मिळणार आहेत. यात 31 लाख 85 हजार 904 गुंतवणूकदाराची इन्व्हेस्टमेंट राहणार आहे आणि उर्वरित 78 लाख 61 हजार 182 रुपये रिटर्न मिळणार आहेत.

5 हजार रुपयांची स्टेप अप एसआयपी किती वर्षांनी बनवणार करोडपती – जर एखाद्या गुंतवणूकदाराने दरमहा पाच हजार रुपयांची गुंतवणूक सुरू केली आणि दरवर्षी गुंतवणुकीची रक्कम दहा टक्क्यांनी वाढवली तर 12 टक्के दराने 21 वर्षांनी एक कोटी 16 लाख 36 हजार 425 रुपये मिळणार आहेत. यामध्ये 38 लाख 40 हजार 150 रुपये गुंतवणूकदाराची इन्व्हेस्टमेंट राहणार आहे आणि उर्वरित 77 लाख 96 हजार 275 रुपये गुंतवणूकदारांना रिटर्न मिळणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe