कोरठण खंडोबा गडावर उसळला जनसागर

Mahesh Waghmare
Published:

कान्हुरपठार। अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान व कुलदैवत असलेल्या पिंपळगाव रोठा ता पारनेर येथील श्री क्षेत्र कोरठण गडावर तीन दिवस चाललेल्या यात्रोत्सवाची मोठ्या भक्तिमय वातावरणात सांगता झाली, यात्रेच्या शेवटच्या दिवशी लाखो भाविकांनी कोरठण नगरीत कुलदैवताचे भक्तिभावाने दर्शन घेतले. सदानंदाचा यळकोट यळकोट यळकोट जय मल्हार नादाने संपूर्ण परीसर दुमदुमून गेला होता

बेल, भंडाराची मुक्त हाताने उधळण करत बुधवारच्या शेवटच्या दिवशी प्रचंड मोठा जनसागर गडावर जमला होता. खंडोबा देवस्थानच्या वार्षिक यात्रोत्सवाची बुधवारी यात्रेच्या मुख्य व शेवटच्या दिवशी ब्राम्हणवाडा (ता. अकोले) व बेल्हे (जि. पुणे) येथील मानाच्या काठ्यांच्या मिरवणुकीनंतर या काठ्यांच्या लाखो भाविकांच्या उपस्थितीत शासकीय महापुजेनंतर काठ्यांच्या देवदर्शन व कळस. दर्शनानंतर इतर गावच्या मानाच्या काठ्यांच्या मिरवणुकीनंतर शांततेत व उत्साहात सांगता झाली. ही यात्रा तीन दिवस साजरी झाली याकाळात लाखात भाविकांनी खंडोबाचे दर्शन घेतले. भाविकांच्या गर्दीचा उच्चांक बुधवारी झाला. एक ते दोन लाख भाविक यात्रेच्या शेवटच्या दिवशी उपस्थित होते

पहाटे पाच बुधवारी पहाटे देवदर्शनाला सुरवात झाली. सकाळी खंडोबाची चांदीची पालखी व अळकुटी, बेल्हे, कांदळी, माळवाडी, सावरगांव घुले कासारे कळस येथील मानाच्या पालख्यांची मंदिर प्रदक्षिणा मिरवणूक सुरू झाली ही मिरवणूक दुपारी बाराच्या सुमारास मंदिरासमोर आल्यानंतर पालखी मानकऱ्यांचा देवस्थानकडून सन्मान करण्यात आला.

दुपारी यात्रेचे मुखा आकर्षण असलेल्या बेल्हे व ब्राम्हणवाडा येथील मानाच्या काठ्यांची मिरवणूक सुरू झाली या मिरवणूकीत हजारो भाविकांची गर्दी झाली होती. दुपारी चारच्या सुमारास दोन्ही काठ्या मंदिरासमोर आल्यानंतर पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांच्या हस्ते काठांची शासकीय महापुजा व महाआरती करण्यात आली. या प्रसंगी देवस्थानच्या अध्यक्षा शालिनीताई घुले, उपाध्यक्ष महेश शिरोळे, ज्येष्ठ विश्वस्त अॅड. पांडुरंग गायकवाड, राजेंद्र चौधरी, तुकाराम जगताप, जालियर खोसे,

चंद्रभान ठुबे, सुरेश फापाळे, रामदास मुळे, धोंडीबा जगताप, कमलेश घुले,, महादेव पुंडे, माजी सरपंच आशोक घुले, सरपंच सुरेखा वाळुंज, बाजार समीतीचे अध्यक्ष बाबाजी तरटे, पत्रकार संजय वाघमारे, गोपीनाथ घुले, अमर गुंजाळ, यांच्यासह लाखो भाविकांचा जनसागर उपस्थित होता. शासकीय महापुजा व महाआरतीनंतर ब्राम्हणवाडा काठीने देवदर्शन तर बेल्हे काठीने कळस दर्शन घेतले.

यानंतर इतर गावच्या मानाच्या काठ्यांच्या मिरवणुका पार पडल्या. यात्रे दरम्यान मुंबई, ठाणे, नाशिक, नगर, संगमनेर, जुन्नर, अकोले येथील भाविक कोरठणला आले होते. सर्वाधिक भाविक पुणे जिल्ह्यातून आले होते. कोरठणला प्रचंड गर्दीचा उच्चांक झाल्याने पोलिस निरिक्षक समीर बारवकर यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला. भाविकांच्या सोयीसाठी एस. टी. कडून जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. आरोग्य विभाग, अग्निशमन दल यांनीही चोख व्यवस्था ठेवली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe