Samsaptak Rajyog 2025:- ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह, बारा राशी, नक्षत्र यांना खूप महत्त्व आहे व या आधारावरच ज्योतिषशास्त्र आधारलेले आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.ग्रहांमध्ये जर बघितले तर सूर्य हा ग्रह खूप महत्त्वाचा मानला जातो व त्याची भूमिका देखील ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाची असते.
सूर्याला प्रतिष्ठा तसेच आदराचे प्रतीक मानले जाते. त्यासोबतच मंगळ हा धैर्य, शौर्य तसेच ऊर्जा यांचा कारक ग्रह मानला जातो. आपल्याला माहित आहे की, प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो व यालाच ग्रहांचे गोचर किंवा राशी परिवर्तन असे म्हणतात व अशा राशी परिवर्तनाला काही कालावधी लागतो.
याप्रमाणे मंगळाला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्याकरिता 45 दिवस लागतात तर सूर्यग्रह दर महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. सध्या 14 जानेवारी 2025 पासून सूर्याने मकर राशीमध्ये प्रवेश केला आहे व त्या ठिकाणी फेब्रुवारीपर्यंत सूर्य राहणार आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे मंगळ सध्या कर्क राशीत आहे व अशा पद्धतीने मंगळ आणि सूर्य हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून सातव्या भावात स्थित आहेत.
अशा पद्धतीने या दोन्ही ग्रहांमुळे समसप्तक राजयोग तयार होत असून हा राजयोग जेव्हा दोन ग्रह समोरासमोर येतात किंवा जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून सप्तम स्थानावर असतात तेव्हा तयार होत असतो.हा समसप्तक राजयोग काही राशींसाठी खूप भाग्यवान ठरणार आहे. कोणत्या राशींना हा योग भाग्याचा आणि फायद्याचा ठरेल? त्याबद्दलची माहिती आपण बघू.
समसप्तक राजयोगामुळे ‘या’ राशींवर पडेल पैशांचा पाऊस
1- कन्या राशी- मंगळ आणि सूर्य या दोन्ही ग्रहांचा संयोग आणि समसप्तक राजयोग कन्या राशीच्या व्यक्तींसाठी खूप भाग्यवान ठरू शकणार आहे. यामुळे या लोकांना प्रत्यक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर यश मिळू शकते व आत्मविश्वास देखील वाढण्यास मदत होईल. करिअरच्या बाबतीत बघितले तर हा राजयोग अनेक नवीन संधी देणार आहे. या कालावधीत वडिलोपार्जित मालमत्तेवर सट्टेबाजी करून नफा मिळवू शकाल. विशेष म्हणजे या लोकांची लव लाइफ देखील या कालावधीत खूप उत्तम राहील.
2- धनु राशी-समसप्तक राजयोग धनु राशींच्या व्यक्तींसाठी खूप फलदायी ठरणार आहे. जीवनामध्ये अनेक प्रकारचा आनंद तुमच्या जीवनात प्रवेश करेल. विशेष म्हणजे या व्यक्तींना सूर्य आणि मंगळाचे शुभाशीर्वाद मिळतील व प्रत्येक क्षेत्रामध्ये या व्यक्तींना यश मिळेल. वडिलोपार्जित संपत्ती असेल तर त्यातून फायदा मिळू शकतो व नोकरीच्या क्षेत्रात असलेल्यांना नवनवीन संधी उपलब्ध होतील. सट्टेबाजी किंवा कौटुंबिक व्यवसायात असाल तर तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो व तुमचे आरोग्य देखील या वेळी चांगले राहील.
3- वृश्चिक राशी- समसप्तक राजयोग आणि मंगळ व सूर्य या दोन्ही ग्रहांचा संयोग वृश्चिक राशींच्या व्यक्तींसाठी एक मोठे वरदानच ठरणार आहे. या कालावधीत या व्यक्तींना त्यांच्या नशिबाची संपूर्ण साथ मिळेल. अध्यात्मिक व धार्मिक कार्यामध्ये आवड वाढेल.नोकरी करणाऱ्या लोकांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. जे व्यक्ती व्यवसायात असतील त्यांचा व्यवसाय प्रगतीपथावर जाईल व व्यवसायात मोठी प्रगती होईल. मंगळाचा आशीर्वाद मिळेल व वाहन किंवा मालमत्ता खरेदीची शक्यता आहे.