PF मधून पैसे काढण्याचे नियम बदलले! नवीन वर्षामध्ये ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा; जाणून घ्या नवीन नियम

खाजगी आणि सरकारी क्षेत्रामध्ये काम करणारे प्रत्येक सदस्य हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सदस्य असतात व या माध्यमातून प्रत्येक कर्मचाऱ्यांचे प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीएफ खाते असते व या खात्यामध्ये त्यांच्या पगारातून दरमहा काही ठराविक रकमेचे योगदान दिले जाते व तितकेच योगदान हे कर्मचारी काम करत असलेल्या कंपनीच्या माध्यमातून देखील दिले जाते.

Ratnakar Ashok Patil
Published:
pf new rule

PF Claim Change Rule:- खाजगी आणि सरकारी क्षेत्रामध्ये काम करणारे प्रत्येक सदस्य हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सदस्य असतात व या माध्यमातून प्रत्येक कर्मचाऱ्यांचे प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीएफ खाते असते व या खात्यामध्ये त्यांच्या पगारातून दरमहा काही ठराविक रकमेचे योगदान दिले जाते व तितकेच योगदान हे कर्मचारी काम करत असलेल्या कंपनीच्या माध्यमातून देखील दिले जाते.

अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यामध्ये मोठा निधी तयार होण्यास मदत होते व निवृत्तीनंतर हा निधी कर्मचाऱ्यांना खूप फायद्याचा ठरतो. परंतु निवृत्तीनंतरच नाही तर तुम्ही काही परिस्थितीमध्ये तुमच्या पीएफ खात्यातून इतर वेळेस देखील पैसे काढू शकतात.

परंतु अशा पद्धतीने पैसे काढण्यासाठी काही नियम आहेत व त्या नियमांना धरूनच अशा पद्धतीने पैसे काढता येतात. परंतु आता पीएफमधून पैसे करण्याच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत व ते तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे.

पीएफमधून पैसे काढण्याचे नियम बदलले
तुम्हाला देखील पीएफ खात्यातून पैसे काढायचे असतील तर त्याकरिता असलेल्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे व कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या या नवीन नियमांची तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पीएफ दाव्यांच्या संबंधित नियमांमध्ये बदल केला आहे.

या बदलानुसार जर बघितले तर आता पीएफ क्लेम करताना म्हणजेच पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी आधार कार्डची गरज भासणार नाही. हा नियम काही विशेष श्रेणीमधील कर्मचाऱ्यांसाठी केला गेला आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या नवीन नियमानुसार पीएफचा दावा करण्यासाठी आधार कार्डची आवश्यकता नाही व ही सूट मात्र काही सदस्यांसाठी म्हणजेच काही कर्मचाऱ्यांसाठी देण्यात आली आहे.

या नवीन नियमानुसार आता ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही ते आधार कार्ड नसताना देखील पीएफ खात्यातून पैसे काढण्याचा दावा करू शकतील. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या अशा कर्मचाऱ्यांना आता त्यांचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजेच युएएन नंबर त्यांच्या आधारशी लिंक करण्याचा पर्याय देखील देण्यात आला आहे.

म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांकडे आधार कार्ड नाही ते त्यांचा पासपोर्ट, नागरिकत्व प्रमाणपत्र किंवा कोणत्याही अधिकृत ओळखपत्राद्वारे पीएफ दाव्याची पडताळणी करू शकतात. याव्यतिरिक्त असे कर्मचारी त्यांच्या बँक खात्याचा तपशील किंवा पॅन कार्ड आणि इतर निकषांच्या माध्यमातून त्यांची ओळख सिद्ध करू शकतात किंवा सत्यापित करू शकतात व त्याद्वारे दावा दाखल करू शकतात.

विशेष म्हणजे पाच लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या दाव्याच्या बाबतीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेला त्याच्या कंपनीकडून म्हणजेच नियोक्त्या कडून सदस्याच्या सत्यतेची पुष्टी करावी लागेल.

या बदललेल्या नवीन नियमाचा फायदा कोणाला मिळणार?
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने बदललेल्या या नियमाचा सर्वात मोठा फायदा अशा परदेशी व्यक्तींना होणार आहे जे आधी भारतामध्ये काम करत होते पण आता ते त्यांच्या देशात परतले आहेत.

अशी व्यक्ती भारतीय नसल्यामुळे त्याचे आधार कार्ड त्याला बनवता आले नाही व नवीन नियमानुसार मात्र आता आधार कार्ड विना देखील त्यांना पीएफमध्ये जमा केलेले पैसे काढता येणार आहेत. इतकेच नाहीतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आता विशेष परिस्थितीमध्ये पीएफ दाव्यासाठी युनिव्हर्सल अकाउंट नंबर अर्थात युएएन आधारशी लिंक करण्याची परवानगी देखील दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe