माधुरी खऱ्या अर्थाने ‘धकधक गर्ल’ वाटत होती!

Published on -

मुंबई : माधुरी दीक्षितने बॉलीवूडमधला एक काळ गाजवला. ही ‘धकधक गर्ल’ अनेकांच्या हृदय सिंहासनावर आरूढ झाली होती. लग्नानंतर माधुरीने थोडा ब्रेक घेतला. ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटाद्वारे तिने मराठीत पदार्पण केले. माधुरीचे सौंदर्य अजूनही कमी झालेले नाही.

तिने स्वत:ला अगदी नीट जपले आहे. मध्यंतरी ती एका रिअ‍ॅलिटी शोच्या सेटवर दिसली. या वेळी माधुरीने मस्टर्ड येलो आणि पांढऱ्या रंगाचं कॉम्बिनेशन असणारा अ‍ॅप्लिक वर्कवाला लेहंगा घातला होता.

या लूकमध्ये ती खूपच छान दिसत होती. सेलिब्रिटी स्टायलिस्ट दिशा पंजाबीने तिचा हा लूक खुलवला होता. या लेहंग्यावर तिने खड्यांचा बेल्ट लावला होता. बोटांमधल्या अंगठ्याही शोभून दिसत होत्या. तिने मोती आणि खड्यांच्या बांगड्या घातल्या होत्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe