प्लास्टिक कपामध्ये चहा किंवा कोणतेही गरम पेय प्यायल्याने प्लास्टिकचे कण त्यात विरघळू लागतात. काही प्लास्टिक कप बिस्फेनॉल सारख्या हानिकारक रसायनांचा वापर करून तयार केले जातात, जे पेयांमध्ये विरघळतात व थेट शरीरात जाऊ शकतात. त्यामुळे प्लास्टिक किंवा पेपर कपमध्ये कोणतेही गरम पेय पिणे आरोग्यास हानिकारक आहे.
कोणत्याही स्टॉल व बऱ्याच ठिकाणी सध्या प्लास्टिक कप्सचा वापर केला जातो. त्यामध्ये द्रव पिणे सोपे असल्यामुळे त्याचा दररोज मोठया प्रमाणात सर्रास वापर केला जातो. पण सहज वापरल्या जाणाऱ्या गोष्टीचा आपला आरोग्यावर काय परिणाम होतो. याचा आपण विचार करत नाही.
प्लास्टिकमुळे होणारी हानी टाळण्यासाठी बहुतेक लोक पेपर कप वापरतात. पण पेपर कप वापरणेही आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. पेपर कप तयार करण्यासाठी प्लास्टिक किंवा मेणाचे कोटिंग केले जाते. या पेपरकपमध्ये गरम पेच टाकल्यास त्यामध्ये रसायने मिसळू शकतात, त्यामुळे याच्या सेवनाने हे विषारी पदार्थ थेटशरीरात जाऊ शकतात.
काही प्लास्टिक कप आपण घेत असलेल्या प्लास्टिकची चव किंवा गंध देऊ शकतात. त्यामुळे तुमच्या पेयाची चव व गुणवत्ता बदलू शकते. जर हे कप योग्य रित्या साठवले गेले नाही तर ते बॅक्टेरिया किंवा इतर रोगजंतूंनी दुषित होऊ शकतात त्यामुळे ज्या ठिकाणी असे कप वापरले जातात त्या ठिकाणी चहा, कॉफीसारखे पेय पिणे टाळावे.
जिथे ग्लासमधून गरम पेये दिले जातात, तिथेच त्याच सेवन करण पसंत करा. कारण अशा गोष्टींचे परिणाम एकत्रितरीत्या कालांतराने दिसून येतात. म्हणूनच वेळीच सावध होणं आणि काळजी घेण फार गरजेच आहे.