शिर्डी येथे होणारे राष्ट्रीय अधिवेशन दिशा देणारे ठरेल : आ. दाते

Mahesh Waghmare
Published:

अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात महायुतीचे चांगले वातावरण निर्माण झाले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत महायुतीची सत्ता यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कटिबद्ध होत आतापासूनच नियोजन करावे.

जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढावी, संघटन वाढावे यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. शिर्डी येथे होणारे राष्ट्रीय अधिवेशन हे पक्ष विस्तारासाठी नवी दिशा देणारे ठरेल. असे प्रतिपादन पारनेरचे आमदार काशिनाथ दाते यांनी केले.

अहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाची जिल्हा बैठक आमदार संग्राम जगताप यांच्या संपर्क कार्यालयात माजी आमदार अरुण जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी पक्षाचे आमदार संग्राम जगताप व आमदार काशिनाथ दाते यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, प्रदेश युवतीचे अध्यक्षा संध्या सोनवणे, राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा, जिल्हा कार्यालयीन सचिव साईनाथ भगत, जिल्हा उपाध्यक्ष भीमराव फुंदे, शहा नवाज खान व अशोक जायभाय, जिल्हा युवक अध्यक्ष नंदकुमार मुंडे, संजय कोळगे, जिल्हा सचिव अजित कदम, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, आदींसह सर्व तालुकाध्यक्ष व तालुक्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे शिर्डी येथे १८ व १९ जानेवारीला राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले होते. माजी आमदार अरुण जगताप म्हणाले, विधानसभा निवडणुकीत सर्वांनी एकत्रित काम केल्याने जिल्ह्यात व राज्यात मोठे परिवर्तन झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी काम करून पक्ष वाढीसाठी योगदान द्यावे.

प्रस्ताविकात जिल्हाध्यक्ष अशोक सावंत म्हणाले, शिर्डी येथे होणाऱ्या प्रदेश अधिवेशनात जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापली जबाबदारी चोख पार पाडावी. यावेळी उपस्थित सर्व तालुकाध्यक्षांनी आपापल्या तालुक्याचा कामाचा आढावा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन साईनाथ भगत यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe