रतन टाटांची गुंतवणूक असलेल्या कंपनीसोबत व्यवसाय करा आणि महिन्याला लाखो कमवा! जाणून घ्या माहिती

स्वतःचा व्यवसाय असणे ही काळाची गरज आहे आणि आता व्यवसायाशिवाय पर्याय देखील नाही अशी सध्या परिस्थिती आहे. बेरोजगारीची समस्या भारतामध्ये प्रचंड प्रमाणात उग्र स्वरूप धारण करत आहे व दिवसेंदिवस नोकऱ्यांची उपलब्धता खूपच कमी होत असल्याकारणाने बेरोजगारांचे लोंढे सध्या तयार झाले आहेत.

Ratnakar Ashok Patil
Published:
generic aadhar

Business Idea:- स्वतःचा व्यवसाय असणे ही काळाची गरज आहे आणि आता व्यवसायाशिवाय पर्याय देखील नाही अशी सध्या परिस्थिती आहे. बेरोजगारीची समस्या भारतामध्ये प्रचंड प्रमाणात उग्र स्वरूप धारण करत आहे व दिवसेंदिवस नोकऱ्यांची उपलब्धता खूपच कमी होत असल्याकारणाने बेरोजगारांचे लोंढे सध्या तयार झाले आहेत.

अशा सगळ्या बिकट परिस्थितीमध्ये आता बरेच तरुण व्यवसायाकडे वळताना आपल्याला दिसून येत आहेत. अगदी तुम्हाला देखील अशाच प्रकारे एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल व तुम्ही व्यवसायाच्या शोधात असाल तर आपण या लेखात आयुष्यभर चांगला नफा देईल अशा एका व्यवसायाची माहिती घेणार आहोत व ही तुम्हाला नक्कीच फायद्याची ठरेल.

रतन टाटांची गुंतवणूक असलेली जेनेरिक आधार कंपनीसोबत करता येईल व्यवसाय
प्रसिद्ध असलेली जेनेरिक मेडिसिन स्टार्टअप कंपनी जेनेरिक आधारमध्ये गुंतवणूक करून तुम्ही लाखो रुपये या माध्यमातून कमवू शकतात. जेनेरिक आधार हा एक फार्मसीचा व्यवसाय असून रतन टाटा यांची गुंतवणूक यामध्ये आहे. जेनेरिक आधारची फ्रेंचायसी घेऊन तुम्ही चांगला नफा किंवा चांगला पैसा या माध्यमातून कमवू शकतात.

श्री.अर्जुन देशपांडे यांचा जेनेरिक आधार फार्मसी व्यवसाय आहे व या कंपनीची सुरुवात महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी झाली. परंतु आता जर या कंपनीचा विस्तार बघितला तर देशातील जवळपास 18 राज्यातील 130 पेक्षा जास्त शहरांमध्ये विस्तार झाल्याचे आपल्याला दिसून येते.

फ्रेंचायसी घेतल्यावर कसा मिळतो नफा?
जेनेरिक आधारमध्ये रतन टाटांची गुंतवणूक जास्त आहे व ही कंपनी औषधांवर तब्बल ग्राहकांना 80 टक्के सूट देते व दुकानदारांना 80% पर्यंत मार्जिन या माध्यमातून मिळते. यामध्ये मोठ्या औषध कंपन्या कमाल 15 ते 20 टक्के मार्जिन देतात.

जेनेरिक आधार ही कंपनी 1000 प्रकारची जनरिक औषधे देणार आहे व या औषधांवर ग्राहकांना 80% पर्यंत सूट मिळते. जेनेरिक आधार ही कंपनी ज्यांचे आधीच मेडिकल स्टोअर आहे व ज्यांना नवीन मेडिकल स्टोअर सुरू करायचे आहे त्यांच्यासोबत व्यवसाय करते.

फ्रेंचायजी कशी घ्याल?
तुम्हाला देखील जेनेरिक औषधांसाठी स्टोअर उघडायचे असेल तर त्याकरिता तुम्हाला genericaadhar.com/ या कंपनीच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर त्या ठिकाणी बिझनेस ऑपॉर्च्युनिटी वर क्लिक करा.

या ठिकाणी क्लिक केल्यावर स्क्रीनवर एक ऑनलाईन फॉर्म उघडतो व त्यामध्ये तुमचे नाव, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी व त्यासोबतच विचारलेली आवश्यक माहिती नमूद करा आणि सबमिट बटन दाबा.

जेनेरिक आधार फ्रेंचायसी घेण्यासाठी कुठल्या गोष्टींची गरज भासते?
जसे आपण बघितले की,या कंपनीची फ्रेंचायसी ही ज्या लोकांचे आधीच मेडिकल स्टोअर आहे किंवा ज्यांना नवीन स्टोअर सुरू करायचे आहे त्यांना घेता येते.

तुम्ही जर या कंपनीची फ्रेंचायसी घेतली तर तुम्हाला कंपनीकडून जेनेरिक आधार अर्थात जीए ब्रँडचा लोगो मिळतो व त्याचबरोबर औषध खरेदीसाठी ब्रॅण्डिंग मटेरियल, इन हाऊस प्रॉडक्ट आणि इन हाऊस सॉफ्टवेअर देण्यात येणार आहे व त्यामुळे तुम्हाला ड्रग्ज लायसन्स देखील घ्यावे लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe