Motilal Oswal Mid Cap Fund:- बऱ्याच वर्षापासून गुंतवणुकीचा ट्रेंड बघितला तर मुदत ठेव योजनांकडे मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून येते. कारण यामधील गुंतवणुक सुरक्षित राहते आणि मिळणारा परतावा देखील चांगला मिळतो. परंतु यामध्ये जर आपण गेल्या काही वर्षापासूनचा ट्रेंड बघितला तर म्युच्युअल फंडमध्ये देखील गुंतवणुकीचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे
व अनेक म्युच्युअल फंड योजनांनी गुंतवणूकदारांना सर्वात जास्त परतावा आतापर्यंत मिळवून दिलेला आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाचे असलेल्या म्युच्युअल फंड योजनांमध्ये एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याला आता गुंतवणूकदार पसंती देताना दिसून येत आहेत.
अगदी याचप्रमाणे तुम्हाला देखील जर एखाद्या म्युच्युअल फंड योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर तुम्ही मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंड योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात व सर्वाधिक परतावा मिळवू शकतात.
मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंडने दिला सर्वाधिक परतावा
जर आपण म्युच्युअल फंडाच्या विविध योजना बघितल्या तर यामध्ये मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडने गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा मिळवून दिला आहे
व वार्षिक आधारावर जर परताव्याचे स्वरूप बघितले तर ते 24.7% इतके आहे. हा परतावा एसआयपी गुंतवणुकीचा असून एकरकमी गुंतवणूक केली असेल तर 19 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे.
एक वर्ष कालावधीत मोतीलाल ओसवाल मिड कॅप फंडने किती दिला परतावा?
एक वर्ष कालावधीत या फंडने 50.73 टक्क्यांचा परतावा दिला आहे व दुसऱ्या वर्षाला 48.79 टक्के तसेच तिसऱ्या वर्षाला 33.21 टक्क्यांचा परतावा गुंतवणूकदारांना मिळवून दिलेला आहे.
समजा एखाद्या गुंतवणूकदाराने दहा वर्ष अगोदर एक लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली असती तर सध्याच्या घडीला त्या गुंतवणुकीचे मूल्य 6 लाख 13 हजार 521.24 इतके झाले असते.
विशेष म्हणजे गुंतवणूकदारांमध्ये मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंड विशेष पसंतीचा असून त्याला चक्क ५ स्टार रेटिंग देण्यात आलेले आहे. या फंडाची एकूण प्रॉपर्टी 22,898 कोटी रुपये आहे व खर्च गुणोत्तर 1.59% आहे.