श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे तरुणाने अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीची लाकडी दांडक्याने मारहाण करत हत्या केली तर मारहाण करताना मधे पडलेल्या आईला देखील बेदम मारहाण केल्याची घटना शनिवार दि. १८ रोजी रात्री उशिरा घडली. प्रियंका करण दिवटे (वय २२) असे मारहाणीत मयत झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर आशा नवनाथ दिवटे (वय ४५) ही महिला जखमी झाली.
पत्नीला मारून आरोपी करण नवनाथ दिवटे (वय २६) हा रविवार दि.१९ रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची माहिती देत पोलिसांना शरण गेला. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पेडगाव येथील दिवटे वस्तीवर राहणाऱ्या किरण नवनाथ दिवटे याचे शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्याची पत्नी प्रियंका किशोर दिवटे हिचे दुसऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत तिच्याशी वादावादी सुरू केली.
या वादात आरोपी किरण याने पत्नीला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण सुरू केली. मारहाण सुरू असताना किरण याच्या आईने यात मध्यस्ती करत भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला असता किरण याने आईला देखील मोठ्या प्रमाणात मारहाण केली. या मारहाणीत किरण याच्या आईच्या पायाला मोठी दुखापत झाली.
या मारहाणीत गंभीर जखमी होऊन मोठ्या प्रमाणांत रक्तस्त्राव होऊन किरण याची पत्नी प्रियंका हीचा रात्री उशिरा मृत्यू झाला.
पत्नीची हत्या करत करण दिवटे याने रविवार दि.१९ रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची माहिती देत पोलिसांना शरण गेला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करत पुढील तपास सुरू केला. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी भेट देऊन तपासकामी सूचना दिल्या. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस निरीक्षक किरण शिंदे अधिक तपास करत आहेत.