२१ जानेवारी २०२५ पुणे : राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना उद्दिष्ट देऊन काम करून घेणार आहे.अंमलबजावणी करताना पंचायतस्तरावर भ्रष्टाचार होत आहे, याबाबतच्या तक्रारी येत आहेत. जो अधिकारी घरकुलात पैसे घेईल किंवा इतर कोणत्याही अधिकाऱ्याने पैसे मागितले, तर त्याच्यावर तत्काळ कारवाई करण्याचा इशारा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पुण्यात दिला. तसेच नागरिकांना तक्रारीसाठी स्वतः माझा मोबाईल नंबर, तसेच अधिकाऱ्यांचा नंबर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामविकास विभागाची राज्याच्या ग्रामीण भागात मोठी यंत्रणा आहे.राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांची यातून अंमलबजावणी ग्रामविकास खात्यामार्फत होत असते.राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ग्रामविकास विभागाची ही पहिली विभागीय बैठक पुण्यात घेतली असून, यापुढे सर्व जिल्ह्यांत बैठका घेतल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.जयकुमार गोरे म्हणाले की, घरकुलांचे सर्व्हे करण्याचे आदेश परत दिले आहेत.आवास योजना, तसेच घरकुल उद्दिष्ट मिळाले आहे.१०० दिवसांच्या आत सगळे काम सुरू आहे.महिला बचत गट, तसेच लखपती दीदी योजना हेही सुरू आहेत.
राज्यात १० लाख लखपती उद्दिष्ट मुख्यमंत्री यांनी दिले आहे. ग्रामपंचायतस्तरावर असणाऱ्या योजना, तसेच तीर्थस्थळ योजना अशा इतर योजनांची देखील या वेळी चर्चा करण्यात आली. तसेच, जे काम जिल्ह्याच्या ठिकाणी होणे गरजेचे आहे.मात्र, त्यासाठी नागरिकांना मंत्रालयात यावे लागत आहे.मात्र, आता असे होणार नाही.काम आडले तर, त्यात काय अडचण आहे, का होत नाही याचाही आढावा घेऊन ते तत्काळ पूर्ण करा,असे आदेश मंत्री गोरे यांनी दिले.
मी स्वतःला भाग्यवान समजतो…
मी आमदार झालो, मंत्री झालो, आता पालकमंत्री झालो आहे. याचा मनस्वी आनंद आहे. विठुरायाच्या भूमीचे पालकमंत्री पद मिळाल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो.कोणाच्या बंदोबस्तासाठी माझी निवड झाली आहे,असे म्हणणे चुकीचे आहे.जे काम करतात त्यांच्या पाठीशी उभा राहील,असे या वेळी मंत्री गोरे म्हणाले