‘इस्ट्रोजेन’मुळे महिलांना लागते दारूचे व्यसन

Mahesh Waghmare
Published:

२१ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : उंदरांवर केलेल्या वैद्यकीय पूर्व अभ्यासातून असे दिसून आले आहे की, इस्ट्रोजेनची पातळी वाढल्याने महिलांना दारूचे व्यसन लागू शकते.लैंगिक संप्रेरक (सेक्स हार्मोन) इस्ट्रोजेन महिलांच्या अल्कोहोल सेवन करण्याच्या प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवते,असे न्यूयॉर्कमधील वेल कॉर्नेल वैद्यकीय संस्थेच्या शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या संशोधनात म्हटले आहे.

‘नेचर’ नियतकालिकात प्रकाशित झालेल्या या संशोधनातून दिसून आले की, इस्ट्रोजेनच्या उच्च पातळीमुळे महिलांना जास्त मद्यपान करण्याची इच्छा प्रबळ होते. या पुरुषांच्या बाबतीत मात्र विपुल संसोधन आहे, अलीकडील संशोधनानुसार स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त मद्यपान करतात, असे दिसून आले.

या अतिसेवनामुळे त्यांना पुरुषांपेक्षा आरोग्यावरील दुष्परिणामांना अधिक तोंड द्यावे लागते,असे या संशोधन पथकातील ज्येष्ठ संशोधक डॉ. क्रिस्टन प्लील यांनी सांगितले.इस्ट्रोजेनच्या संभाव्य परिणामांचे मूल्यांकन करण्यासाठी,संशोधकांच्या पथकाने प्रथम मादी उंदरांच्या ओस्ट्रस सायकल दरम्यान (स्त्रियांच्या मासिक पाळीप्रमाणेच) हार्मोनच्या पातळीचे परीक्षण केले आणि नंतर त्यांना अल्कोहोल दिले.त्यांच्यावरील परिणामांवरून स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेनच्या उच्चपातळीमुळे त्यांना जास्त मद्यपान करण्याची इच्छा होते, हे स्पष्ट झाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe