वेदांताचा शेअर मार्केटमध्ये करणार धुमाकूळ! गुंतवणूकदार होऊ शकतात मालामाल; वाचा फायद्याची अपडेट

शेअर मार्केटमध्ये सध्या अनेक शेअर फोकसमध्ये आल्याचे दिसून येत आहे व शेअर्समध्ये वेदांता लिमिटेड कंपनीचा शेअर्स देखील आता पुन्हा तेजी घेईल अशी शक्यता दिसून येत असून सध्या हा शेअर फोकसमध्ये आला आहे. जर आपण आज म्हणजेच 21 जानेवारी 2025 रोजीची स्थिती बघितली तर या कंपनीच्या शेअरमध्ये 0.20% घसरण झाली व 460.05 रुपयांवर पोहोचला होता.

Ratnakar Ashok Patil
Published:
vedanta share

Vedanta Share Price:- शेअर मार्केटमध्ये सध्या अनेक शेअर फोकसमध्ये आल्याचे दिसून येत आहे व शेअर्समध्ये वेदांता लिमिटेड कंपनीचा शेअर्स देखील आता पुन्हा तेजी घेईल अशी शक्यता दिसून येत असून सध्या हा शेअर फोकसमध्ये आला आहे. जर आपण आज म्हणजेच 21 जानेवारी 2025 रोजीची स्थिती बघितली तर या कंपनीच्या शेअरमध्ये 0.20% घसरण झाली व 460.05 रुपयांवर पोहोचला होता.

वेदांत लिमिटेड कंपनीचे सध्याचे मार्केट कॅप एक लाख 79 हजार 428 कोटी रुपये आहे व या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 526.95 तर नीचांकी पातळी २४९.५० रुपये होती.

परंतु सध्या या कंपनीच्या रिफायनान्सिंग संबंधित जी काही रिस्क होती त्यामध्ये मोठी घट झाल्यानंतर फीच रेटिंग एजन्सीने वेदांता रिसोर्सेस लिमिटेड या मुळ वेदांता कंपनीची रेटिंग अपडेट केली असून हेच कारण हा शेअर्स पुन्हा फोकसमध्ये येण्यासाठी कारणीभूत ठरले आहे.

वेदांता कंपनीच्या शेअरवर या गोष्टीचा होईल सकारात्मक परिणाम
वेदांता लिमिटेडची उपकंपनी असलेल्या वेदांत रिसोर्सेस फायनान्स 2 पीएलसी द्वारे जारी केलेल्या आणि वेदांत रिसोर्सेस लिमिटेडने बिनशर्थ आणि अपरिवर्तनीय हमी दिलेल्या तीनशे दशलक्ष डॉलरच्या जून 2028 च्या रोखे आणि पाचशे दशलक्ष डॉलरच्या डिसेंबर 2031 बॉण्ड्सवरील रेटिंग RR4 च्या रिकव्हरी रेटिंगसह B- वरून B+ मध्ये अपग्रेड केले आहे

व याचा सकारात्मक परिणाम वेदांता कंपनीच्या शेअरवर होईल अशी शक्यता दिसून येत आहे.वेदांता कंपनी शेअरचा एक वर्षाचा बीटा जर बघितला तर तो 1.3 आहे व हा बीटा या कालावधीत खूप जास्त अस्थिरता दर्शवतो व टेक्निकल चार्टनुसार या कंपनीचा सापेक्ष सामर्थ्य निर्देशांक 57.3 आहे व यावरून संकेत मिळतो की स्टॉक ओव्हर बाय किंवा ओव्हर सोल्ड क्षेत्रात ट्रेड करू शकत नाही.

आपण बघितले की, फीच रेटिंग एजन्सीने देखील वेदांत रिसोर्सेस लिमिटेड कंपनीची रेटिंग B- वरून B+ मध्ये अपग्रेड केली आहे व दृष्टिकोन सुद्धा स्थिर केलेला आहे.

आता ही सगळी परिस्थिती जर बघितली तर येणाऱ्या कालावधीत वेदांता शेअरवर सकारात्मक परिणाम होऊन हा शेअर फोकसमध्ये येऊ शकतो व त्यामध्ये तेजी देखील येऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe