पटकन श्रीमंत होण्यासाठी ‘या’ म्युच्युअल फंड योजनेतील गुंतवणूक ठरेल गेमचेंजर! वेगात गाठता येईल लाखो ते कोटींचा टप्पा

मुदत ठेव योजना आणि अनेक सरकारी बचत योजना यांच्यामध्ये ज्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते अगदी तितक्याच प्रमाणात म्युच्युअल फंड योजनांमध्ये देखील आता गुंतवणुकीचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या कालावधीनुसार वेगवेगळा परतावा मिळू शकतो.

Ratnakar Ashok Patil
Published:
motilal oswal mid cap fund

Motilal Oswal Mid Cap Fund:- मुदत ठेव योजना आणि अनेक सरकारी बचत योजना यांच्यामध्ये ज्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते अगदी तितक्याच प्रमाणात म्युच्युअल फंड योजनांमध्ये देखील आता गुंतवणुकीचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या कालावधीनुसार वेगवेगळा परतावा मिळू शकतो.

काही म्युच्युअल फंड योजना तर इतक्या प्रभावी आहेत की, तीनच वर्षात एक लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक तिप्पटी पेक्षा देखील जास्त आणि पाच वर्षात तिप्पट इतकी वाढ यामध्ये झाल्याचे दिसून आले आहे. यामध्ये एसआयपी हा खूप उत्तम असा गुंतवणुकीचा प्रकार असून या माध्यमातून देखील चांगला असा परतावा गुंतवणूकदारांना मिळाला आहे.

अगदी यानुसारच तुम्हाला देखील जर एखाद्या म्युच्युअल फंड योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल तर मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंड योजना ही खूप फायद्याचे आहे. त्यामुळे या योजनेच्या मागील कामगिरीचा आढावा आपण थोडक्यात बघू.

मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंडाची कामगिरी
या फंडामध्ये पाच वर्ष कालावधी गुंतवणुकीकरिता वार्षिक एकरकमी परतावा 30.74 टक्क्यांपर्यंत मिळालेला आहे. यानुसार जर एक लाख रुपये एकरकमी गुंतवणूक केली असती तर पाच वर्षातील एकूण निधी हा तीन लाख 82 हजार रुपये इतका झाला असता व एकूण नफा 3 लाख 11 हजार 330.55 इतका मिळाला.

तसेच
जर आपण एसआयपीच्या माध्यमातून मिळणारा परतावा बघितला तर पाच वर्ष गुंतवणुकीसाठी वार्षिक 37.64% इतका मिळाला आहे. समजा तुम्ही पाच वर्षे कालावधी करिता महिन्याला दहा हजार रुपयांची गुंतवणूक एसआयपीच्या माध्यमातून केली असती तर पाच वर्षात एकूण गुंतवणूक सहा लाख रुपये झाली व पाच वर्षानंतर या एसआयपीचे मूल्य व्याज व मुद्दल मिळून 14 लाख 99 हजार 817 रुपये इतके झाले.

मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड फेब्रुवारी 2014 ला लॉन्च करण्यात आला होता व तेव्हापासून आतापर्यंत मिळणारा वार्षिक परतावा हा 25.10% इतका राहिलेला आहे. या म्युच्युअल फंड योजनेमध्ये तुम्ही एकरकमी किमान पाचशे रुपये तर एसआयपीमध्ये प्रतिमाह किमान पाचशे रुपयांची गुंतवणूक करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe