किम यांच्या ‘स्पेशल ट्रेन’मध्ये सुंदर तरुणींची ‘प्लेजर ब्रिगेड’ ! हजारो मुलींमधून केली जाते निवड, भरघोस पगार

Mahesh Waghmare
Published:

२२ जानेवारी २०२५ प्योंगयांग : उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग-उन वडील किम जोंग-इल यांच्याप्रमाणेच त्यांच्या विलक्षण सवयीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांना वडिलांप्रमाणेच हवाई प्रवासाची भीती वाटते आणि त्यामुळे ते वडिलांप्रमाणेच विशेष रेल्वेचा वापर करत असतात. त्यांच्या या रेल्वेतील ‘प्लेजर ब्रिगेड’ कुतूहलाचा विषय आहे. रेल्वेतील या स्टाफसाठी देशभरातून कुमारिका तरुणीच निवडल्या जातात आणि त्या किम आणि त्यांच्या पाहुण्यांच्या सरबराईत असतात.

किम जोंग-उन यांच्या आधी उत्तर कोरियावर राज्य करणारे त्यांचे आजोबा किम इल-सुंग यांनीही रेल्वे प्रवासाला पसंती दिली होती. किम यांची रेल्वे कडेकोट सुरक्षा उपायांनी सुसज्ज आहे. या रेल्वेला ‘धावता किल्ला’ असेही संबोधले जाते.

स्टॅलिन यांनी भेट दिली होती रेल्वे

उत्तर कोरियाचे सत्ताधारी किम कुटुंब वापरत असलेली ‘लक्झरी ट्रेन’ ही सोव्हिएत युनियनचे नेते जोसेफ स्टॅलिन यांनी उत्तर कोरियाला भेट दिलेली, आहे. तेव्हापासून ही रेल्वे उत्तर कोरियाच्या नेत्यांसाठी अधिकृत रेल्वे म्हणून चालवली जाते. या रेल्वेचा रंग बाहेरून हिरवा, पिवळा आहे.आतील भाग चमकदार पांढऱ्या रंगाचा आहे.टेबल, फ्लॅट-स्क्रीन मॉनिटरने सुसज्ज आहे.प्रवासादरम्यान पत्रकार परिषद,बैठका घेण्याची सोयही रेल्वेत आहे.

खाण्या-पिण्याची चंगळ

माजी रशियन अधिकारी कॉन्स्टीटन पुलिकोव्स्की यांनी उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्या खासगी ट्रेनबद्दल ‘ओरिएंट एक्स्प्रेस’ या पुस्तकात माहिती दिली आहे. त्यानुसार किमच्या प्रवासादरम्यान फ्रेंच वाइन, कोळंबी आणि डुकराचे मांस यासह स्वादिष्ट पदार्थांचा मेनू असतो. किम जोंग उनचे वडील यांच्यासोबत मॉस्को दौऱ्यावर गेलेल्या एका रशियन अधिकाऱ्याने ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थाची तोंडभरून स्तुती केली होती.

काय आहे प्लेजर ब्रिगेड ?

कॉन्स्टॉटनच्या पुस्तकानुसार, किम जोंग उन महिला कंडक्टर म्हणून ज्यांची ओळख करून देतात, त्या तरुण स्त्रिया, ट्रेनमध्ये प्रवाशांचे मनोरंजन करतात. या महिलांना ‘प्लेजर ब्रिगेड’ म्हणूनही ओळखले जाते. यासाठी संपूर्ण उत्तर कोरियातून सुंदर मुलींची निवड केली जाते. ‘प्लेजर ब्रिगेड’मध्ये सामील होण्यासाठी सर्वात महत्त्वाची अट म्हणजे ती तरुणी कुमारिका असणे आवश्यक आहे.

डॉक्टरांचे पथक अर्जदार तरुणींची तपासणी करते मग त्यांची निवड होते. स्वतः किम २५ तरुणींची निवड करतात,असे सांगितले जाते.ट्रेनमध्ये काम करण्यासाठी निवडलेल्या या महिलांना भरघोस पगार मिळतो.२०१५ मध्ये उत्तर कोरियामध्ये उंच, सडपातळ आणि सुंदर महिलांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली होती.किम जोंग उनची सर्वप्रकारे सरबराई करणे, हेच त्यांचे सर्वात महत्त्वाचे काम.त्यांना पगार म्हणून ३००० डॉलरपेक्षा जास्त पैसा मिळतो.परंतु पाश्चात्त्य प्रसारमाध्यमे या महिला किम जोंग यांच्या लैंगिक गुलाम आहेत,असा आरोप करतात.

रेल्वेत ९० सुसज्ज गाड्या

दक्षिण कोरियातील वृत्तपत्र चोसुन इल्बोमधील २००९ च्या लेखानुसार किम जोंग-उन यांच्या खासगी ट्रेनमध्ये ९० गाड्या आहेत. त्याच्या मर्सिडीज कारची वाहतूक करण्यासाठी ही रेल्वे सुसज्ज आहे. त्यांचे वडील किम जोंग-इल हेही अशाच प्रकारे रेल्वेत सगळा जामानिमा घेऊन फिरायचे.

आलिशान जीवनशैली

किम जोंग-उन आलिशान जीवनशैलीसाठी ओळखले जातात.आयात केलेले उंची मद्य विशेष सिगारेट आणि परदेशी मांस यांचा त्यात समावेश आहे.अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेली त्याची खासगी रेल्वे हे त्याच्या ऐश्वर्याचे प्रतीक आहे.

काटेकोर प्रक्रियेद्वारे निवडलेली तरुणीची एक टीम या रेल्वेत रेल्वेसुंदरी (रेल्वे होस्टेस) म्हणून काम करते.या आलिशान रेल्वेत काहीही कमी नाही,खवय्यांच्या जेवणापासून ते भव्य मनोरंजनापर्यंत सर्व गरजा तेथे पूर्ण होतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe