जिओ फायनान्शिअल सर्विसेस, रॅमको सिमेंट्ससह ‘हे’ स्टॉक गुंतवणूकदारांना देणार जबरदस्त परतावा ! शेअर बाजारातील तज्ञांनी दिलीये बाय रेटिंग

काल आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे बीएसई सेन्सेक्स 329.92 अंकांच्या घसरणीसह 76,190.46 वर बंद झाला होता. तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच एनएसई निफ्टी 50 113.15 अंकांनी घसरून 23,092.20 वर बंद झाले.

Tejas B Shelar
Published:

Share Market Tips : काल 24 जानेवारीला शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली, आठवड्याचा शेवटचा दिवस होता म्हणून गुंतवणूकदारांना शेअर बाजारात तेजी येईल असा विश्वास होता. मात्र तसे काही घडले नाही काल आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली अन यामुळे गुंतवणूकदारांमध्ये निराशाचे वातावरण होते.

पण या घसरणीच्या काळात गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. स्टॉक मार्केटच्या विश्लेषकांनी आगामी काळात शेअर बाजारातील काही कंपन्यांचे स्टॉक गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय.

मित्रांनो, काल आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे बीएसई सेन्सेक्स 329.92 अंकांच्या घसरणीसह 76,190.46 वर बंद झाला होता. तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच एनएसई निफ्टी 50 113.15 अंकांनी घसरून 23,092.20 वर बंद झाले.

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजारात नक्कीच घसरण झाली आहे पण स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी 5 असे शेअर्स सुचवले आहेत जे की नजीकच्या भविष्यात आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देऊ शकणार आहेत.

दरम्यान आता आपण तज्ञांनी कोणते 5 शेअर सुचवले आहेत अन या शेअरची टार्गेट प्राईज काय राहणार, या शेअरसाठी स्टॉप लॉस किती असायला हवा ? याचाच सविस्तर आढावा घेणार आहोत.

या स्टॉक मध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना मिळणार चांगला परतावा!

स्टॉक मार्केट विश्लेषक आशिष बाहेती यांनी LTIMindtree Limited कंपनीच्या शेअर साठी बाय रेटिंग दिली आहे. हा स्टॉक 6100 ते 6200 दरम्यान जाऊ शकतो असा दावा तज्ञांनी केला असून या शेअर साठी 5900 रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

स्टॉक मार्केट विश्लेषक प्रकाश गाबा यांनी आय आर सी टी सी लिमिटेड या कंपनीच्या स्टॉकवर विश्वास दाखवत बाय रेटिंग दिली आहे. या स्टॉक ची किंमत 820 रुपयांपर्यंत जाऊ शकते असा दावा तज्ञांनी केला असून या स्टॉक साठी 788 रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.

स्टॉक मार्केट विश्लेषक अमित सेठ यांनी Maruti Suzuki Limited कंपनीच्या स्टॉक वर विश्वास दाखवत याला बाय रेटिंग दिली आहे. हा स्टॉक आगामी काळात 12 हजार 300 रुपयांना टच करणार आणि या शेअर साठी 11900 रुपयांचा स्टॉप लॉस लावायला हवा असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

केआर चोक्सी ब्रोकरेज फर्मने जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीवर विश्वास दाखवत याला बाय रेटिंग दिली आहे. या शेअर साठी 286 रुपयांची टार्गेट प्राईज निश्चित करण्यात आली असून गुंतवणूकदारांना हा स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

स्टॉक मार्केट विश्लेषक शिल्पा राऊत यांनी रॅमको सिमेंट लिमिटेड कंपनीचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकला बाय रेटिंग देत या स्टॉक साठी 935 ते 940 रुपयांची टार्गेट प्राईज निश्चित करण्यात आली असून स्टॉप लॉस 895 रुपयांचा लावावा असा सल्ला देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe