31 जानेवारीपर्यंत फक्त 8 लाखात खरेदी करता येणार ‘ही’ मायलेज कार ! फेब्रुवारीत पुन्हा किमती वाढतील? वाचा…

31 जानेवारी 2025 पर्यंत या गाडीच्या थर्ड जेन Amaze ची लाँचिंग प्राईस अर्थात प्रस्तावित किंमत कायम राहील पण नंतर याची किंमत वाढणार आहे. अर्थातच 31 जानेवारी पर्यंत ग्राहक ही नवीन कार स्वस्तात खरेदी करू शकतात. यामुळे जर तुम्हालाही ही गाडी खरेदी करायची असेल तर या चालू महिन्यातच तुम्हाला ही गाडी खरेदी करावे लागणार आहे.

Tejas B Shelar
Published:

Best Mileage Car : नव्या वर्षात नवीन कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी हाती आली आहे. प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी Honda ने अलीकडेच एक मोठी घोषणा केली आहे. कंपनी लवकरच आपल्या एका लोकप्रिय मॉडेलच्या किमतीत वाढ करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार होंडा कंपनी आपल्या लोकप्रिय अमेझ या कारची किंमत फेब्रुवारी महिन्यात वाढवणार आहे.

31 जानेवारी 2025 पर्यंत या गाडीच्या थर्ड जेन Amaze ची लाँचिंग प्राईस अर्थात प्रस्तावित किंमत कायम राहील पण नंतर याची किंमत वाढणार आहे. अर्थातच 31 जानेवारी पर्यंत ग्राहक ही नवीन कार स्वस्तात खरेदी करू शकतात.

यामुळे जर तुम्हालाही ही गाडी खरेदी करायची असेल तर या चालू महिन्यातच तुम्हाला ही गाडी खरेदी करावे लागणार आहे. या चालू महिन्यात ही गाडी खरेदी केली तर तुम्हाला ही गाडी स्वस्तात मिळणार आहे. त्यानंतर मात्र कंपनी या गाडीची किंमत वाढवू शकते.

हे मॉडेल भारतात 4 डिसेंबर 2024 रोजी लॉन्च करण्यात आले होते. डिसेंबर महिन्यात लॉन्च झालेले हे मॉडेल ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय बनले आहे. अवघ्या काही दिवसांच्या काळातच या गाडीने ग्राहकांमध्ये लोकप्रियता मिळवली आहे आणि ही गाडी मोठ्या प्रमाणात सेल होत आहे.

सध्या होंडा अमेझच्या या नवीन आवृत्तीबाबत ग्राहकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. अशा परिस्थितीत आज आपण या गाडीचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसे आहेत फिचर्स?

होंडा अमेझच्या तिसऱ्या जनरेशनच्या या मॉडेलमध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्याचे नवीन बाह्य आणि अपग्रेड केलेले इंटीरियर हे नेहमीपेक्षा अधिक स्टाइलिश आणि आकर्षक बनवले आहेत.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या मॉडेलला ‘लेव्हल 2 ADAS’ (प्रगत ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीम) देण्यात आले आहे, जे आतापर्यंत फक्त टॉप-स्पेक ZX प्रकारांवर उपलब्ध होते. ADAS सारखी वैशिष्ट्ये कारला सेगमेंटमध्ये आणखी खास बनवतात.

Honda Amaze च्या या नवीन मॉडेलमध्ये ग्राहकांना तीन प्रकार आणि 6 रंगांचे पर्याय मिळतात. हे केवळ 1.2 लिटर पेट्रोल इंजिनसह उपलब्ध आहे. Honda Amaze या सेगमेंट मधील मारुती Dezire, Hyundai Aura, Maruti Baleno, Tata Altroz ​​आणि Hyundai i20 सारख्या कारशी स्पर्धा करते.

याविषयी बोलताना होंडा कार्स इंडियाचे मार्केटिंग आणि विक्री विभागाचे उपाध्यक्ष कुणाल बहल म्हणाले की, तिसऱ्या पिढीच्या होंडा अमेझला ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद लाभला आहे. ग्राहकांनी त्याच्या स्टायलिश डिझाइन, प्रीमियम अपील आणि सेगमेंट-फर्स्ट ADAS वैशिष्ट्यांचे कौतुक केले आहे.

आमच्या ग्राहकांचा हा विश्वास आम्हाला आमचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रेरित करतो. म्हणून नवीन Amaze ची सुरुवातीची किंमत 31 जानेवारी 2025 पर्यंत वाढवताना आम्हाला आनंद होत आहे.

एकंदरीत फेब्रुवारी महिन्यात या गाडीच्या सुधारित किमती जाहीर होणार आहेत आणि तेव्हा या गाडीच्या किमती वाढू शकतात. त्यामुळे जर तुम्हाला ही नवी गाडी खरेदी करायची असेल तर तुम्ही जानेवारी महिन्यातच ही कार खरेदी करा जेणेकरून तुमचे हजारो रुपये वाचतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe