सिम कार्ड रिचार्ज न करता किती दिवस वापरता येते? नियम सांगतात की….

अनेकांच्या माध्यमातून किती दिवस रिचार्ज केले नाही तर सिम कार्ड चालू राहते असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे याबाबतही TRAI ने काही नियम तयार केलेले आहेत. आज आपण याच नियमांची अगदी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

Tejas B Shelar
Published:

Sim Card Rule : अलीकडे सर्वजण मोबाईल, स्मार्टफोन वापरतात. मोबाईल आणि स्मार्टफोन मध्ये सिम कार्ड सुद्धा असते. सिम कार्ड ला आपण सर्वजण रिचार्ज करतो आणि कॉलिंग तसेच एसएमएस आणि इंटरनेटचा वापर करत असतो. पण सिम कार्ड संदर्भात काही नियम असतात जे तुम्हाला माहिती असायला हवेत.

दरम्यान अनेकांच्या माध्यमातून किती दिवस रिचार्ज केले नाही तर सिम कार्ड चालू राहते असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे याबाबतही TRAI ने काही नियम तयार केलेले आहेत. आज आपण याच नियमांची अगदी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. रिचार्ज न करता सिम कार्ड किती दिवस ऍक्टिव्ह राहते याबाबत TRAI चे नियम आता आपण समजून घेणार आहोत.

रिचार्ज न करता सीम किती दिवस ऍक्टिव्ह राहते?

मित्रांनो, मध्यंतरी बातम्यांमध्ये ९० दिवस रिचार्ज केले नाही तरी देखील सिम ऍक्टिव्ह राहते असा दावा करण्यात आला होता. दरम्यान आता याच संदर्भात TRAI ने मोठी माहिती दिली आहे.

TRAI ने सांगितल्याप्रमाणे, रिचार्ज केल्याशिवाय 90 दिवस कनेक्शन तोडले जाणार नाही, असा दावा करणारा कोणताही आदेश त्यांच्याकडून देण्यात आलेला नाही. TRAI ने सिम कार्ड बाबत नवीन नियमावली जारी केली आहे.

या नव्या नियमावलीनुसार, सिमकार्ड अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यासाठी 20 रुपये बॅलन्स असणे बंधनकारक आहे. म्हणजेच किमान 20 रुपये बॅलन्स असेल तेव्हाचं सिम कार्ड ऍक्टिव्ह राहणार आहे.

वीस रुपयांपेक्षा कमी बॅलन्स असेल तर सिम कार्ड ऍक्टिव्ह राहणार नाही. सिम कार्डच्या नव्या नियमावलीनुसार, 20 रुपये बॅलन्स नसेल तर TRAI कडून अशा ग्राहकांवर कारवाई केली जाणार आहे.

कमी बॅलन्स असणाऱ्या ग्राहकांवर कडक कारवाई करण्यात येईल आणि सिमकार्ड निष्क्रिय केले जाणार आहे. तसेच, TRAI ने कंपन्यांना सर्व्हिस व्हाउचर आणण्यास सांगितले आहे, तसे झाल्यास त्यांना सेवेसाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

दरम्यान आता काही कंपन्यांकडून ग्राहकांच्या सेवेसाठी असे प्लॅन आणले गेले आहेत, ज्याअंतर्गत रिचार्ज करून युजर्स फक्त व्हॉईस आणि एसएमएसचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय दुसरे बेनिफिट जसे की इंटरनेटचा बेनिफिट मिळवण्यासाठी युजर्सना वेगळे रिचार्ज करावे लागणार आहे.

एकंदरीत कोणताही रिचार्ज न करता 90 दिवस सिम कार्ड ऍक्टिव्ह राहू शकते असा जो दावा सोशल मीडियामध्ये होत होता तो दावा खोटा असून सिम कार्ड ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी किमान 20 रुपयांचा बॅलन्स चाचणी आवश्यक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe