पैसा मिळवण्याचे टार्गेट सेट करा! एसबीआयमध्ये कराल एफडी की पोस्ट ऑफिसमध्ये? कुठून मिळेल बंपर पैसा? जाणून घ्या माहिती

गुंतवणुकीसाठी विश्वासार्ह आणि चांगला परतावा देणारा पर्याय म्हणून मुदत ठेव योजनांकडे पाहिले जाते. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय असलेला पर्याय कोणता असेल तर तो म्हणजे मुदत ठेव म्हणजेच एफडी योजना होय.

SBI FD vs Post Office FD:- गुंतवणुकीसाठी विश्वासार्ह आणि चांगला परतावा देणारा पर्याय म्हणून मुदत ठेव योजनांकडे पाहिले जाते. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय असलेला पर्याय कोणता असेल तर तो म्हणजे मुदत ठेव म्हणजेच एफडी योजना होय.

आपल्याला माहित आहे की,वेगवेगळ्या बँकांच्या माध्यमातून मुदत ठेव योजना राबवल्या जातात व कालावधीनुसार यामध्ये आकर्षक असे व्याजदर देखील ऑफर केले जातात. वेगवेगळ्या बँकांप्रमाणेच पोस्ट ऑफिस देखील आकर्षक अशी एफडी योजना राबवते व या माध्यमातून देखील आता मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याकडे ट्रेंड दिसून येत आहे.

अगदी याच पद्धतीने तुम्हाला देखील एफडी करायची असेल तर तुमच्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एफडी करणे फायद्याचे ठरेल की पोस्ट ऑफिसमध्ये? याबाबतची थोडक्यात माहिती बघू.

पाच वर्ष कालावधीच्या एफडीतून कुठून मिळेल जास्त परतावा?
यामध्ये जर स्टेट बँक ऑफ इंडियाचा विचार केला तरी ही बँक 3.50 टक्क्यांपासून ते 7.25% पर्यंत वेगवेगळ्या कालावधीनुसार व्याजदर देत आहे. त्या तुलनेत पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेवींवर जर बघितले तर पोस्ट ऑफिस 6.09% ते 7.5% व्याजदर देत आहे.

समजा एखाद्या गुंतवणूकदाराला जर पाच वर्षाच्या कालावधी करिता एफडी करायची असेल तर स्टेट बँक ऑफ इंडिया 6.5% परतावा देत आहे तर पोस्ट ऑफिस याच कालावधीसाठी 7.5% परतावा देत आहे.

पाच वर्ष कालावधीसाठी एफडी केल्यावर कुठून मिळेल जास्त परतावा हे उदाहरणाने समजून घेऊ
समजा एखाद्या गुंतवणूकदाराने पाच वर्षात स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये साडेतीन लाख रुपयांची एफडी केली आहे. या केलेल्या एफडीवर 6.5 टक्के वार्षिक व्याज मिळाले तर या पैशाचा अंदाजे परतावा एक लाख 33 हजार 147 रुपये असेल.व्याज व मुद्दल मिळून तुमची एकूण रक्कम चार लाख 83 हजार 147 रुपये असेल.

त्या तुलनेत मात्र पोस्ट ऑफिसमध्ये जर तुम्ही साडेतीन लाख रुपयांची एफडी केली तर त्या ठिकाणी तुम्हाला 7.5% वार्षिक व्याजदराने हा परतावा एक लाख 57 हजार 482 रुपये असेल व व्याज आणि मुद्दल मिळून तुमची एकूण रक्कम पाच लाख सात हजार 482 मिळेल.

या तुलनात्मक उदाहरणावरून आपल्याला दिसून येते की, एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये केलेल्या एफडीपेक्षा पोस्ट ऑफिस एफडीमध्ये गुंतवणूकदारांना जास्त फायदा मिळताना आपल्याला दिसून येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe