Personal Loan EMI:- आजकाल वैयक्तिक कर्ज घेणे खूप सोपे झाले आहे.विशेषतः जेव्हा अचानक आर्थिक गरज उद्भवते तेव्हा कर्जाचा पर्याय अवलंबला जातो. मात्र, कर्ज घेण्याआधी त्यासंबंधित संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. पगार कमी असतानाही वैयक्तिक कर्ज मिळवणे शक्य आहे. परंतु त्यासाठी काही अटी व नियम आहेत. जर तुमचा मासिक पगार १०,००० रुपये असेल, तर तुम्हाला किती कर्ज मिळू शकते? EMI किती बसेल?पात्रतेचे निकष काय आहेत? याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया.
१. वैयक्तिक कर्ज म्हणजे काय?
वैयक्तिक कर्ज हे अशा प्रकारचे कर्ज आहे ज्याचा उपयोग कोणत्याही वैयक्तिक खर्चासाठी करता येतो.जसे की, आपत्कालीन वैद्यकीय खर्च, लग्नाचा खर्च, घरगुती खर्च किंवा शैक्षणिक गरजा. हे कर्ज कोणत्याही तारणाशिवाय दिले जाते, म्हणूनच हे अनसिक्योर्ड लोनप्रकारात येते.
१०,००० रुपये पगारावर कर्ज किती मिळेल?
पगार कमी असताना कर्जाची रक्कम ठरवण्यासाठी बँक किंवा वित्तीय संस्था काही महत्त्वाचे घटक विचारात घेतात:
1-क्रेडिट स्कोर: चांगला क्रेडिट स्कोर असल्यास कर्ज मिळण्याची शक्यता वाढते.
2-कर्ज परतफेडीची क्षमता: तुमचं कर्ज कर्ज फेडण्याचं प्रमाण (Debt-to-Income Ratio) ४०%-५०% च्या आत असावं.जर तुमचा मासिक पगार १०,००० रुपये असेल, तर तुम्हाला अंदाजे ५०,००० ते १,००,००० रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. मात्र, ही रक्कम तुमच्या क्रेडिट स्कोर, कामाचा कालावधी आणि इतर घटकांवर अवलंबून असते.
EMI कसा ठरतो?
P: कर्ज रक्कम
R: मासिक व्याज दर
N: कर्जाचा कालावधी
उदाहरणार्थ, जर तुम्हाला ५०,००० रुपये कर्ज मिळाले, १२% वार्षिक व्याजदर असेल आणि कालावधी २ वर्षांचा असेल, तर तुमचा EMI अंदाजे २,३५५ रुपये असेल.
४. पात्रतेचे निकष
बँक किंवा वित्तीय संस्था कर्ज मंजूर करण्यासाठी काही पात्रतेचे निकष ठरवतात:
1-वय: किमान २१ वर्षे ते ६५ वर्षांपर्यंत.
नोकरी: किमान ६ महिने ते १ वर्ष सतत नोकरीत असणे गरजेचे.
2-पगार: मासिक पगार नियमितपणे बँक खात्यात जमा होणे.
3-क्रेडिट स्कोर: किमान ७५० किंवा त्याहून अधिक चांगला असणे आवश्यक आहे.
कर्ज घेण्यापूर्वी विचार करण्यासारख्या गोष्टी
1-क्रेडिट स्कोर तपासा: चांगल्या क्रेडिट स्कोरसह तुम्हाला कमी व्याजदरावर कर्ज मिळू शकते.
2-कर्जाच्या अटी व शर्ती वाचा: कोणतेही लपलेले शुल्क (Hidden Charges) नसावेत.
3-EMI गणना करा: मासिक हप्ते तुमच्या बजेटमध्ये बसतात का, हे निश्चित करा.
कर्ज फेडण्याची योजना ठरवा: कर्ज परतफेड वेळेवर करण्याचा प्रयत्न करा.
कर्जासाठी ऑनलाईन अर्ज कसा कराल?
आजकाल अनेक बँका आणि वित्तीय संस्था ऑनलाईन कर्ज अर्ज स्वीकारतात. यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रं अपलोड करा. पात्रता तपासल्यानंतर कर्ज मंजूर होईल.