टाटा पॉवरचे शेअर्स गुंतवणूकदारांना बनवणार श्रीमंत! शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक BUY करावा का? पहा…

Tejas B Shelar
Published:

Tata Power Share Price : गेल्या दोन दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये वाढ झाली असल्याने गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

या तेजीच्या काळात टाटा समूहाचा टाटा पॉवर हा स्टॉक सुद्धा गुंतवणूकदारांना चांगला परतावा देताना दिसणार आहे. या शेअरमध्ये तेजीचे संकेत मिळत असून टॉप ब्रोकरेज फर्मने यासाठी बाय रेटिंग जाहीर केली आहे.

दरम्यान आता आपण या स्टॉक साठी ब्रोकरेज कडून काय टार्गेट प्राईज देण्यात आली आहे? या स्टॉकची सध्याची स्थिती कशी आहे, गेल्या पाच वर्षांमध्ये या स्टॉकने गुंतवणूकदारांना किती परतावा दिला आहे? याच साऱ्या बाबींचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

टाटा पावर शेअरची सध्याची स्थिती

या शेअरची प्रेविअस क्लोजिंग प्राईस 351.90 रुपये एवढी होती. सध्या हा स्टॉक 1.73 टक्क्यांनी वधारला आहे आणि शेअर बाजारात 345.90 रुपयांवर ट्रेड करत आहे. स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 494.85 रुपये, तर स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 338.40 रुपये रुपये राहिली.

सध्या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 1,10,670 करोड रुपये आहे. तसेच कंपनीवर सध्या 58,314 करोड रुपये इतकं कर्ज आहे. 28 जानेवारीला हा स्टॉक शेअर बाजारात 342.95 ते 356.10 यादरम्यान ट्रेड करत होता. तसेच गेल्या एका वर्षभरात या शेअरची ट्रेडिंग रेंज 338.40 ते 494.85 इतकी राहिली आहे.

टाटा पावर शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना किती परतावा दिला

गेल्या 5 दिवसात टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचा स्टॉक -3.89 टक्क्यांनी घसरलाय, तसेच मागील एका महिन्यात 11.25 टक्क्यांनी घसरलाय अन मागील 6 महिन्यात -21.79 टक्क्यांनी घसरलाय. शिवाय मागील एका वर्षात हा शेअर -9.43 टक्क्यांनी घसरला आहे.

तसेच YTD आधारावर टाटा पॉवर कंपनी लिमिटेड कंपनी शेअर -11.84 टक्क्यांनी घसरला आहे. पण मागील 5 वर्षात हा शेअर 527.77 टक्क्यांनी वधारला आहे. तसेच लॉन्ग टर्ममध्ये टाटा पॉवर कंपनी लिमिटेड कंपनी स्टॉक 3,291.18 टक्क्यांनी वधारला आहे. दरम्यान आता या स्टॉकला बाय रेटिंग देण्यात आली आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने या स्टॉक साठी बाय रेटिंग दिली आहे.

काय आहे टार्गेट प्राईस

मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने या स्टॉक साठी बाय रेटिंग दिली आहे म्हणजेच हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. स्टॉक मार्केट मधील विश्लेषकांनी या स्टॉक साठी 509 रुपयांचे नवीन टारगेट प्राईज दिलेले आहे. म्हणजेच या स्टॉक ची किंमत 509 रुपयांना टच करू शकते असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe