Bank Of Baroda Minimum Balance : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात बँकिंग सेक्टर मध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. अगदी खेड्यापाड्यातील लोक देखील बँकिंग व्यवस्थेसोबत जोडले गेले आहेत.
नागरिकांचे विविध खाजगी, सरकारी तसेच सहकारी बँकांमध्ये अकाउंट आहेत. देशात सध्या स्थितीला 12 पब्लिक सेक्टर बँक म्हणजेच सरकारी बँका आहेत. बँक ऑफ बडोदा देखील देशातील एक प्रमुख सरकारी बँक आहे.

मार्केट कॅपच्या बाबतीत बँक ऑफ बडोदा ही भारतातील दुसर्या क्रमांकाची सर्वात मोठी सरकारी बँक. बँक ऑफ बडोदाची सध्याची बाजारपेठ सुमारे 1.14 लाख कोटी रुपये आहे. या बँकेचे देशभरात करोडो ग्राहक आहेत.
जर आपणही बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर ही बातमी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण की आज आपण बँक ऑफ बडोदाच्या सेविंग अकाउंट मध्ये किती मिनिमम बॅलन्स असायला हवं? याबाबत बँकेचे काय नियम आहेत? मिनिमम बॅलन्स मेंटेन केले नाही तर बँक किती दंड आकारते? याच साऱ्या मुद्द्यांचा आढावा घेणार आहोत.
किती मिनिमम बॅलन्स असायला हवा?
बँक ऑफ बडोदाने वेगवेगळ्या क्षेत्रांनुसार बँक खात्यासाठी किमान शिल्लक मर्यादा निश्चित केली आहे. ग्रामीण भागात असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या खात्यांसाठी किमान शिल्लक मर्यादा 500 रुपये आहे.
अर्ध-शहरी भागात असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या खात्यांसाठी किमान शिल्लक मर्यादा 1000 रुपये आहे आणि दिल्ली-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये असलेल्या खात्यांसाठी किमान शिल्लक मर्यादा 2000 रुपये आहे.
जर आपण आपल्या खात्यात बँकेद्वारे निश्चित केलेली किमान मिनिमम बॅलन्स ठेवले नाही तर, बँक आपल्या खात्यातून दंडाची रक्कम वसूल करत असते.
बँक ऑफ बडोदा मिनिमम बॅलन्स मेंटेन केला नाही तर किती दंड वसूल करते?
जर आपण बँकेत तिमाही आधारावर किमान शिल्लक मर्यादा राखली नाही तर आपल्याला दंड भरावा लागतो. मेट्रो आणि शहरी क्षेत्राच्या खात्यांसाठी दंडाची रक्कम दोनशे रुपये एवढी निर्धारित करण्यात आली आहे.
तसेच अर्ध-आर्बन क्षेत्राच्या खात्यांसाठी दंडाची रक्कम शंभर रुपये इतकी ठरवण्यात आली आहे. म्हणजेच बँक खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवणे आवश्यक आहे. जर मिनिमम बॅलन्स ठेवला गेला नाही तर बँकेकडून दंड वसूल केला जात असतो. महत्त्वाचे म्हणजे दंडाची रक्कम बँक तुम्हाला न विचारता तुमच्या खात्यातून थेट कपात करत असते.